इंदोरा बु. : तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती इंदोरा बु.च्या वतीने आंबेडकर स्मारकामध्ये गणतंत्र दिनाचा ध्वजारोहण सोहळा ग्रा.पं. उपसरपंच दिनेश पटले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष मुरलीदास गोंडाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रा.पं. सदस्य सेवेंद्र अंबुले, अरुणा वासनिक, डॉ. शामराव गजभिये, अशोक राऊत, उमराव मेश्राम, राजेंद्र बन्सोड, अनिल मेश्राम, गजेंद्र खांडेकर, संतोष टेंभेकर, रामदास डोंगरे, रीना राऊत, अतुल गोंडाणे, प्रियंका गोंडाणे, भाग्यलक्ष्मी गोंडाणे, बलीराम बिसेन, संतोष असाटी उपस्थित होते.
आदिवासी गोवारी स्मारक
इंदोरा बु. : आदिवासी गोवारी स्मारकाजवळ प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते तोरणलाल सोनवाणे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस पाटील हितेश सोनवाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच प्रभा अंबुले, थलीराम रहांगडाले, रमेश कृपाले, स्मारक समिती अध्यक्ष इसन आंबेडारे, बुद्धल राऊत, मुरलीदास गोंडाणे, मारुती आंबेडारे, राजू आंबेडारे, सुखदास राऊत, घनश्याम शहारे, बब्बा राऊत, वसंत चौधरी उपस्थित होते.
जुनी ग्रामपंचायत बिल्डिंग
इंदोरा बु. : जुनी ग्रामपंचायत इमारत व हनुमान देवस्थान चौकच्या प्रांगणात राजाभोज समितीचे अध्यक्ष कवडू अंबुले यांच्या अध्यक्षतेखाली माजी पं.स. सदस्य रामजी अंबुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ग्रामपंचायत भवन, इंदोरा
इंदोरा बु. : ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात गणतंत्र दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हौशीलाल सोनवाणे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच प्रभा अंबुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपसरपंच दिनेश पटले, मुख्याध्यापक के.जे. शरणागत, डिगांबर अंबुले, सेवेंद्र अंबुले, रमेश कुपाले, वंदना मेश्राम, अरुणा वासनिक, अनिता बिसेन, रविकांता ठाकरे, पंचफुला बिसेन, मुरलीदास गोंडाणे, तोरण सोनवाणे, हितेश सोनवाणे, बुद्धल राऊत, सुषमा अंबुले, सुनीता ठाकरे, भगत, ममता बिसेन, मेश्राम, उपस्थित होते.
वरिष्ठ प्राथमिक शाळा इंदोरा
इंदोरा बु. : जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा इंदोरा बु.च्या प्रांगणात सरपंच प्रभा अंबुले यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लाखन राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उच्चश्रेणी मुख्याध्यापक के.जे. शरणागत, रिनाईत, खोब्रागडे, नरेश चौरे, प्रशांत कोठे, शहारे, चौहान, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय
इंदोरा बु. : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय तिरोडाच्या प्रांगणात प्रजास्ताक दिनाचा कार्यक्रम आ. विजय रहांगडाले, माजी आ. भजनदास वैद्य, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंचशील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी.व्ही. गोडाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रा. व्ही.डी. मेश्राम, कृष्णा रामटेके, एल.एस. मेश्राम, पृथ्वीराज मेश्राम, संस्थेचे सचिव सुरेश बन्सोड, सुरेश ग्यानचंदानी, निलू रामटेके, के.एफ. मेश्राम, वंदना चौहान, दहाटे, वैशाली तिरपुडे, रंजित बन्सोड उपस्थित होते.
.....
अदिती कनिष्ठ महाविद्यालय, नवेगाव खुर्द
इंदोरा बु. : अदिती माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नवेगाव खुर्द तिरोडाच्या प्रांगणात अध्यक्ष सुरेश बन्सोड यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णा रामटेके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला संस्था सचिव शोभा बन्सोड, पृथ्वीराज मेश्राम, शिक्षकवृंद, पालक उपस्थित होते. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन करून शपथ घेण्यात आली.