शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

भू्रण हत्या करणाऱ्यांचे नाव कळवा

By admin | Updated: March 19, 2017 00:31 IST

मुलींचे घटते प्रमाण ही चिंतनीय बाब असून हे प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना आखल्या आहे.

अभिमन्यू काळे : रोख २५ हजार रूपयांचे बक्षीस देण्याची घोषणा गोंदिया : मुलींचे घटते प्रमाण ही चिंतनीय बाब असून हे प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना आखल्या आहे. स्त्री भ्रुण हत्या करणाऱ्या डॉक्टरांचे व सोनोग्राफी केंद्राचे नाव कळविणाऱ्या जागरुक नागरिकास २५ हजार रु पये रोख रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिली. स्त्री भ्रुण हत्या या विषयाला घेवून आयोजीत पत्रपरिषदेत माहिती देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक चंद्रशेखर कलासागर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी काळे यांनी, एखादया सोनोग्राफी केंद्रावर लिंगनिदान होत असल्याची खात्रीलायक माहिती असल्यास बनावट केस करण्यासाठी गरोदर महिलांनी संमती दर्शविल्यास त्यांचेही नाव व ओळख गुप्त ठेवून जिल्हा प्रशासन गर्भिलंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रावर कडक कारवाई करण्यासाठी पुढाकार घेईल. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे. तसेच गर्भिलंग निदान चाचणी करण्याचा व करणाऱ्यांचा सक्त विरोध करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. गोंदिया जिल्ह्यात लिंग गुणोत्तर प्रमाण सन २०१३-१४ मध्ये ९५५, सन २०१४-१५ मध्ये ९२३, सन २०१५-१६ मध्ये ९५७ तर चालू वर्षी आतापर्यंत ९३८ असे आहे. जिल्ह्यात लिंग गुणोत्तर प्रमाणात होणारी घसरण ही आपल्या सर्वांसाठी अतिशय गंभीर बाब आहे. या पाशर््वभूमीवर १५ मार्च ते १५ एप्रील या कालावधीत सर्व अल्ट्रा सोनोग्राफी व गर्भपात केंद्राची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. याकरीता स्थापन करण्यात येणाऱ्या समितीमध्ये आरोग्य, महसूल, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश राहणार आहे असल्याचे डॉ.पातुरकर यांनी यावेळी सांगितले. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे घडलेल्या नुकत्याच घटनेवरुन लिंग निदान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा अर्थात पी.सी.पी.एन.डी.टी. यासारखा कडक कायदा अस्तित्वात असतांना गर्भलिंग निदान होत असल्याच्या गंभीर घटनेची दखल राज्य शासनाने घेतली असल्याचे सांगीतले. राज्यात सन २०११ च्या जनगणनेच्या उपलब्ध आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर प्रमाण ८९४ इतके आहे. सन २००१ च्या जनगणनेच्या तुलनेत हे प्रमाण १३ टक्क्याने कमी झाले आहे. गोंदिया जिल्ह्याचे सध्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण ९३८ इतके आहे. राज्यातील ० ते ६ वर्ष या वयोगटातील नागरी नोंदणी जन्माच्या वेळीचे लिंग गुणोत्तर प्रमाण सन २०१५ मध्ये ९०७ होते, तर २०१६ मध्ये ते ८९९ इतके झाले आहे, म्हणजे ८ अंकाने घटले आहे. माहिती खरी ठरल्यानंतरच ही रक्कम देण्यात येते. नागरिकांनी खरी व खात्रीशीर माहिती पुरवावी. विनाकारण सोनोग्राफी केंद्राची बदनामी होईल अथवा निष्पाप डॉक्टरला मनस्ताप होईल अशी माहिती पुरवू नये असेही त्यांनी सांगीतले. (शहर प्रतिनिधी) - माहिती देणाऱ्यांचे नाव राहणार गुप्त ज्या सोनोग्राफी केंद्रावर गर्भलिंग निदान होत आहे अशी माहिती नागरिकांना मिळाल्यास ही माहिती तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्ह्यातील महत्वाचे अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांना कळवावी. १०४ आणी १८००२३३४४७५ या टोल फ्री क्रमांकावरही माहिती नागरिक देवू शकतात. त्याचप्रमाणे संकेतस्थळावर ही माहिती दिल्यास त्याची तात्काळ दखल घेण्यात येईल. गर्भंलिंग निदान करणाऱ्या व्यक्ती किंवा सोनोग्राफी केंद्राबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीस २५ हजार रु पयांचे रोख बक्षीस देण्यात येईल. विशेष म्हणजे यासंबंधी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.