शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

२९१ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनातर्फे संयुक्तपणे उपाययोजना राबविल्या जात आहे. याचेच फलित म्हणजे मागील २८ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. जिल्हा कोरोनामुक्त असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गोंदियाचा ग्रीन झोनमध्ये समावेश केल्याने जिल्ह्यातील व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली आहे.

ठळक मुद्दे२८ दिवसात नवीन रुग्णांची नोंद नाही : १८ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मात्र जिल्ह्यात मागील २८ दिवसात एकही नवीन रुग्णांची नोंद झाली नसल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण ३०९ जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी शुक्रवारपर्यंत २९१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १८ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे.जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनातर्फे संयुक्तपणे उपाययोजना राबविल्या जात आहे. याचेच फलित म्हणजे मागील २८ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही.जिल्हा कोरोनामुक्त असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गोंदियाचा ग्रीन झोनमध्ये समावेश केल्याने जिल्ह्यातील व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने काही व्यवहारांना शिथिलता देत बुधवार, गुरूवार, शुक्रवार या तीन दिवशी सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीत काही दुकाने वगळता इतर सर्व बाजारपेठ सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे व्यावसायीकांसह नागरिकांना सुध्दा थोडा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडीही लक्षणे दिसताच त्यांना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करुन त्यांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून उपचार केले जात आहे. त्यामुळेच गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यास मदत होत आहे.१०५ जण शासकीय क्वारंटाईन कक्षातकोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसताच अशा व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय क्वारंटाईन कक्षात ठेवले जात आहे. सध्या जिल्ह्यातील सात क्वारंटाईन कक्षात एकूण १०५ जण उपचार घेत आहे. यामध्ये नवीन जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड केअर सेंटरमध्ये ५२, एम.एस.आयुर्वेदिक महाविद्यालय कुडवा गोंदिया १७, चांदोरी ७, लिटिल बर्ड कॉन्व्हेंट नगर परिषद तिरोडा ४, समाज कल्याण निवासी शाळा, डव्वा ६, शासकीय आश्रमशाळा इळदा १३ आणि बिरसी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे ६ अशा एकूण १०५ व्यक्तींचा समावेश आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या