शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्त करून किंवा नवीन मशीन तरी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2022 05:00 IST

राज्य रस्ते परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, अंध यासह अन्य समाजघटकांना सवलतीच्या दरात प्रवासासाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी १ जूनपासून केली जाणार होती. मात्र, अपेक्षित प्रमाणात स्मार्ट कार्ड तयार झाले नसावे की काय? महामंडळाने या योजनेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली असून, १ जुलैपासून योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

 कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  येत्या १ जुलैपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. असे असताना मात्र जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा आगारातील पीओएस मशीन अद्याप दुरुस्त होऊन आलेली नसल्याने या आगारात स्मार्ट कार्ड योजना फसणार असल्याचे दिसत आहे. याबाबत ‘लोकमत’ने ६ जून रोजीच्या अंकात हा प्रकार उघडकीस आणला होता. यानंतर विभागीय नियंत्रकांनी या बातमीची दखल घेत महाव्यवस्थापकांना (मुंबई) पत्र पाठवून आगारांतील मशीन दुरुस्त करून द्या किंवा नवीन मशीन देण्याची मागणी केली आहे. राज्य रस्ते परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, अंध यासह अन्य समाजघटकांना सवलतीच्या दरात प्रवासासाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी १ जूनपासून केली जाणार होती. मात्र, अपेक्षित प्रमाणात स्मार्ट कार्ड तयार झाले नसावे की काय? महामंडळाने या योजनेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली असून, १ जुलैपासून योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यातही १ जुलैपासून स्मार्ट कार्ड नसल्यास संबंधितांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. मात्र आश्चर्याची बाब अशी की, स्मार्ट कार्डसाठी लागणारी पीओएस मशीन नसल्याने गोंदिया व भंडारा आगारांतील कामच ठप्प पडले आहे. ही बाब लक्षात घेत ‘लोकमत’ने ६ जून रोजीच्या अंकात ‘एसटीच्या स्मार्ट कार्डला नादुरुस्त पीओएस मशीनचा खोडा’ अशी बातमी प्रकाशित करून हा प्रकार उघडकीस आणला होता. याची दखल घेत विभागीय नियंत्रक महेंद्र नेवारे यांनी महाव्यवस्थापकांना (मुंबई) पत्र पाठवून आगारांतील नादुरुस्त मशीन दुरुस्त करून देण्याची किंवा नवीन मशीन देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता मशीन कधी येते, हे बघायचे आहे. 

कंपनी प्रतिनिधींचेही दुर्लक्ष - पीओएस मशीनच्या या विषयाला घेऊन ट्रायमेक्स कंपनीचे नागपूर येथील प्रतिनिधी मनोज गजघाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी २-३ दिवसांत तात्पुरती व्यवस्था करून देणार, असे सांगितले होते. मात्र, त्याला आता ८ दिवस लोटले असूनही आगारांना मशीन मिळालेले नाही. यावरून कंपनीच्या प्रतिनिधींचेही या विषयाकडे दुर्लक्ष आहे, असेच म्हणावे लागेल. 

 योजनेला आणखी मुदतवाढीची गरज

- गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा आगारातील पीओएस मशीन नादुरुस्त असतानाच भंडारा जिल्ह्यातील तुमसर आगारातील मशीनही नादुरुस्त असल्याची माहिती आहे. यावरून राज्यात आणखीही कित्येक आगारांतील मशीन नादुरुस्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात ३० जूनपर्यंत स्मार्ट कार्ड बनवून देणे, त्यांचे अॅक्टिव्हेशन, वितरण ही कामे ठप्प पडली आहेत. परिणामी, या योजनेला एकदा मुदतवाढ दिलेली असतानाच आणखी मुदतवाढ देण्याची गरज दिसून येत आहे. 

महाव्यवस्थापकांना पत्र पाठविले आहे गोंदिया व तिरोडा आगारातील मशीन बंद असल्याने याबाबत महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून मशीन दुरुस्त करून देण्याची किंवा नवीन मशीन देण्याची मागणी केली आहे. - महेंद्र नेवारे विभागीय व्यवस्थापक, भंडारा  

 

टॅग्स :state transportएसटी