शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
8
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
9
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
10
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
11
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
12
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
13
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
14
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
15
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
16
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
17
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
18
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
19
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
20
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल

वनहक्क पट्ट्यांची प्रकरणे त्वरित निकाली काढा

By admin | Updated: April 22, 2017 02:27 IST

जिल्ह्यातील वैयक्तिक व सामूहिक वनहक्क जमिनीच्या पट्ट्यांचे वाटप तातडीने करण्यासाठी महसूल विभागाने

पालकमंत्र्यांचे निर्देश : महसूल विभागाने करावा पाठपुरावा गोंदिया : जिल्ह्यातील वैयक्तिक व सामूहिक वनहक्क जमिनीच्या पट्ट्यांचे वाटप तातडीने करण्यासाठी महसूल विभागाने वन विभागाच्या सहकार्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करु न ही प्रकरणे तातडीने निकाली काढावी, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील वनहक्क जमिनीच्या पट्टे वाटपाच्या प्रकरणांचा आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, उपवनसंरक्षक एस.युवराज, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, देवरी उपविभागीय अधिकारी एम.एच.टोणगावकर, तिरोडाचे उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे, तहसीलदार अरविंद हिंगे, अपर तहसीलदार के.डी.मेश्राम, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विलास ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण मिहरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. बडोले पुढे म्हणाले, तिरोडा शहरातील झुडूपी जंगल प्रकरणाचा केंद्र शासनाकडे योग्य पाठपुरावा करुन ज्याप्रमाणे निपटारा करण्यात आला, त्याचप्रमाणे गोंदिया शहरातील संजयनगर येथील झुडूपी जंगल प्रकरणाचा सुध्दा निपटारा करण्यास त्यांनी सांगितले. आ.रहांगडाले यांनी जिल्ह्यातील वनहक्क पट्टे जमीनधारकांना पीक कर्ज व पीक विमा मंजूर झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्यातील सामूहिक वनहक्क दाव्यांची संख्या ३९५ इतकी असून मंजूर गटांची संख्या ८४३ इतकी आहे. यांना ३८६७६.५६ हेक्टर जमीन मंजूर करण्यात आली आहे. प्रलंबीत असलेल्या २५७ दाव्यात तपासणीचे काम सुरु असल्याचे त्यांनी उपजिल्हाधिकारी ठाकरे यांनी यावेळी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी) ९८३ दावे प्रलंबित जिल्ह्यात वैयक्तिक वनहक्काचे ग्रामस्तरीय गावे १५९०, उपविभागीयस्तरीय समितीकडे ३५१२, तर जिल्हास्तरीय समितीकडे ९८३ दावे प्रलंबित असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे यांनी यावेळी दिली. एकूण प्राप्त प्रकरणांपैकी निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या १५६५४ इतकी असून वाटप केलेल्या टायटलची संख्या ८४३१ इतकी आहे. ४८११,२३१ हेक्टर टायटल्सच्या जमिनीचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.