शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

रिमोटव्दारे होत असलेली वीज चोरी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST

रेलटोली येथील एका वीज ग्राहकाच्या घरातील विद्युत मीटरची तपासणी केली. त्यांच्या घरी होत असलेल्या विजेच्या वापरापेक्षा प्रत्यक्षात कमी मीटर रिडींग होत असल्याचे आढळले. त्यामुळे विद्युत मीटरची तपासणी केली असता त्यात छेडछाड केल्याचे आढळले. त्यांनी तपासणी केली असता रिमोटव्दारे मीटर रिडींग कमी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देभरारी पथकाची कारवाई : दीड लाखांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वीज वितरण कंपनीतर्फे शहरात वीजचोरी पकडण्याची मोहीम मंगळवारपासून सुरू करण्यात आली. या मोहिमेदरम्यान शहरातील रेलटोली परिसरात रिमोटव्दारे वीज चोरी करणाऱ्या एका ग्राहकाला भरारी पथकाने पकडले. त्याच्यावर दीड लाख रुपयांचा दंड ठोठावला.महावितरणचे कार्यकारी अभियंता शरद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता अश्विन शहाणे व सहाय्यक अभियंता सुनील रेवतकर हे मंगळवारी रेलटोली परिसरात वीज चोरीची शोध मोहीम राबवित होते. या दरम्यान रेलटोली येथील एका वीज ग्राहकाच्या घरातील विद्युत मीटरची तपासणी केली. त्यांच्या घरी होत असलेल्या विजेच्या वापरापेक्षा प्रत्यक्षात कमी मीटर रिडींग होत असल्याचे आढळले.त्यामुळे विद्युत मीटरची तपासणी केली असता त्यात छेडछाड केल्याचे आढळले. त्यांनी तपासणी केली असता रिमोटव्दारे मीटर रिडींग कमी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला.पथकाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ग्राहकाला याबाबत विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यास टाळटाळ केली. मात्र पोलीस कारवाई होणार असल्याचे सांगताच त्यांनी विद्युत मिटरची रिडींग कमी करण्यासाठी वापर करीत असलेले रिमोट दिले. त्यानंतर सदर रिमोटचा रिडींग कमी करण्यासाठी कसा वापर केला जातो याची पाहणी करण्यासाठी त्यांनी विद्युत मीटर उघडून पाहिले. तेव्हा या वीज चोरीचे बिंग फुटले.हे रिमोट कुठून खरेदी केले अशी विचारणा अधिकाऱ्यांनी केली असता त्यांनी याची माहिती देण्यास टाळटाळ केली. भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी मीटर रिडींग कमी करण्यासाठी विद्युत मीटरमध्ये लावलेली किट आणि रिमोट जप्त केला. विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ नुसार १ लाख ४३ हजार ५७० रुपयांचा दंड आकारला.सदर ग्राहकाने दंड भरण्याची तयारी दर्शविल्याने फौजदारी कारवाई करणे टाळण्यात आल्याची माहिती आहे. मुख्य तंत्रज्ञ राजू उके यांच्या नेतृत्त्वात शहरात वीज चोरीची शोध मोहीम राबविण्यात येत आहे.रिमोट तयार करणारे रॅकेट सक्रियगोंदिया जिल्ह्यात आठ वर्षांपूर्वी सुध्दा रिमोटव्दारे विद्युत मिटर तयार करणाऱ्यांची टोळी महावितरणच्या अधिकाºयांनी पकडली होती. त्यानंतर आता पुन्हा शहरातील रेलटोली परिसरातील एका वीज ग्राहकाच्या घरी असलेल्या विद्युत मीटरमध्ये लावली किट आणि रिमोट पकडले. त्यामुळे हे रिमोट तयार करणारे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती आहे.महावितरणसमोर आव्हानविद्युत वितरण कंपनीतर्फे वीज चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहे. मात्र यानंतरही यावर आळा बसलेला नाही. त्यातच आता रिमोटव्दारे मीटरची रिडींग कमी करुन देणारी टोळी सक्रीय झाल्याने त्यांना शोधण्याचे महावितरण समोर आव्हान निर्माण झाले आहे.

टॅग्स :electricityवीजtheftचोरी