शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी पिक लागवडीवरील निर्बंध हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:49 IST

मागील वर्षी जिल्ह्यात केवळ ५४ टक्के पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्पांमध्ये सुद्धा मोजकाच पाणीसाठा होता. भूजल पातळीत सुद्धा २ मीटरने घट झाल्याने प्रशासनाने रब्बी व उन्हाळी पिकांची लागवड करण्यास निर्बंध घातले होते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्याला यश

देवानंद शहारे ।ऑनलाईन लोकमतगोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात केवळ ५४ टक्के पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्पांमध्ये सुद्धा मोजकाच पाणीसाठा होता. भूजल पातळीत सुद्धा २ मीटरने घट झाल्याने प्रशासनाने रब्बी व उन्हाळी पिकांची लागवड करण्यास निर्बंध घातले होते. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेत पिकांच्या लागवडीवर लावले निर्बंध हटविले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.सततच्या दुष्काळामुळे जलस्रोतांमध्ये घट झाल्याने पाटबंधारे विभागाने उन्हाळी पिकांना पाणी देण्यास नकार दिला होता. शिवाय भूजल पातळी खालावल्याने उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईकडे पाहून उन्हाळी पीक न घेण्याचा आदेश काढण्यात आला होता. परंतु निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांच्या ३० जानेवारी २०१८ च्या पत्रान्वये सदर पिकांची लागवड करण्यास लावले निर्बंध हटविण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे.खरीप हंगामात शेतकरी रोज आभाळाकडे बघून पावसाची वाट पाहत होता. मात्र अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकºयांना हाती आलेले पिक गमवावे लागले. वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना खर्चाच्या प्रमाणातही मोबदला मिळाला नाही. ज्यांनी पीक लावले होते त्या पिकांवरही कीडरोगांनी आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांनी उभे पीक जाळले. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्येला तोंड लागले. मागील चार दशकात प्रथमच अशी स्थिती निर्माण झाली होती.आता रबी व उन्हाळी धानपीक घेवून परिस्थिती सावरू असा विचार असतानाच १७ नोव्हेंबर २०१७ रोजी रबी/उन्हाळी पिके लावण्यास प्रतिबंध घालण्याचे आदेश काढण्यात आले होते.अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रतिबंध हटविण्यासाठी अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. खासदार प्रफुल्ल पटेल यांनीे ७ जानेवारी २०१८ चे पत्र व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे १७ नोव्हेंबर २०१७ च्या कार्यालयीन पत्रानुसार ते आदेश रद्द करण्यात आले आहे.जिल्ह्यात धान पिकांच्या रोवणीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ७८ हजार २२९ हेक्टर आहे. मात्र पावसाने वेळोवेळी दगा दिल्याने हजारो हेक्टर क्षेत्र रोवणीपासून वंचित राहिले. तसेच कीडरोगांमुळे हाती आलेले उत्पन्नही गेले. त्यानंतर आता उन्हाळी धानपिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार हेक्टर असताना शासनाने लागवड न करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता उन्हाळी धानपीक लावण्याचे आदेश मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.रब्बी पिकांची लागवड २४ हजार हेक्टरमध्येजिल्ह्यात लाखोळी, हरभरा, उळीद आदी कमी पाणी लागणाऱ्या रबी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ८०० हेक्टर आहे. यापैकी २४ हजार हेक्टरवर रबी पिके लावण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. यात कडधान्य, तृणधान्य व गळीताची धान्य लावली जातात. सात हजार हेक्टरमध्ये लाखोळी, नऊ हजार ८०० हेक्टरमध्ये हरभरा व उर्वरित काही क्षेत्रात इतर कमी पाणी लागणाºया पिकांची लागवड करण्यात आली आहे.