शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाघ नदीच्या पात्रात मृत कोंबड्या-बकºयांचे अवशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:33 IST

शहरातील मांस विक्रेते त्यांच्या दुकानातील केरकचरा सालेकसा-आमगाव मार्गावरील वाघ नदीच्या पात्रात सर्रासपणे टाकत आहेत.

ठळक मुद्देशहरवासीयांना दूषित पाण्याचा पुरवठा : प्रशासनाची डोळेझाक

राजीव फुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शहरातील मांस विक्रेते त्यांच्या दुकानातील केरकचरा सालेकसा-आमगाव मार्गावरील वाघ नदीच्या पात्रात सर्रासपणे टाकत आहेत. परिणामी नदीचे पाणी दूषीत होत असून याच पाण्याचा आमगाव शहरवासीयांना पुरवठा केला होत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.शासन आणि प्रशासनातर्फे एकीकडे नदी स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. त्यावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. ऐवढेच नव्हे तर व्यापकस्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षीतपणामुळे नदी प्रदूषीत केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्याप्त आहे. आमगाव लगत असलेल्या वाघ नदीमध्ये येथील काही मांस विक्रेते त्यांच्या दुकानातील शिल्लक केरकचरा व मृत कोंबड्या-बकºयांचे मांस नदीमध्ये टाकत असल्याचे बोलल्या जाते. लोकमत प्रतिनिधीने नदी पात्राला भेट देवून पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात केरकचरा आणि मृत कोंबड्या-बकºयांचे अवशेष आढळले. केवळ मांस विक्रेतेच नव्हे तर इतरही काही लोक केरकचरा नदीच्या पात्रात टाकत असल्याची माहिती आहे. परिणामी नदीचे पाणी प्रदूषीत होत आहे. शिवाय या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. आमगाव येथील नागरिकांनी याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले. मात्र त्याचा कसलाच उपयोग झाला नाही. नदीच्या पात्रात केरकचरा आणि मृत कोंबड्या-बकºया टाकणाºयांवर प्रशासनातर्फे कुठलीच कारवाई केली जात नसल्याने त्यांची देखील हिम्मत वाढल्याचे चित्र आहे.आमगाववासीयांचे आरोग्य धोक्यातबाघ नदीच्या पात्रातूनच आमगाववासीयांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र त्याच पात्रातील पाणी केरकचºयामुळे दूषीत होत आहे. त्यामुळे आमगाववासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजसेवक झनक बहेकार यांनी तहसीलदार राठोड यांची भेट घेवून निवेदन दिले. केरकचरा टाकणाºया संबंधीत मांस विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र प्रशासनाने अद्यापही कुठली कारवाई केली नाही.आंदोलनाचा इशारायेथील वाघ नदीच्या पात्र काही मांस विक्रेते केरकचरा टाकत असल्याने नदीचे पाणी दूषीत होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याची वेळीच दखल घेवून संबंधितांवर त्वरीत कारवाई करावी. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमगाववासीयांनी दिला आहे.वाघ नदीच्या पात्रात काही मांस विक्रेते मृत कोंबड्या बकºयांचे अवशेष आणि केरकचरा टाकत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर परिषदेने याची त्वरीत दखल घेवून नदीपात्र स्वच्छ करुन संबंधितांवर कारवाई करावी.विजय शिवणकर, माजी जि.प.अध्यक्षया प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून लवकर नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. संबंधित मांस विक्रेत्यांना नोटीस देवून कारवाई केली जाईल.एस.एल.नागपुरे, नायब तहसीलदार,

टॅग्स :riverनदी