शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा....लसीकरणानंतर १४ दिवसांनी करता येणार रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 05:00 IST

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, त्याला प्रतिबंध लावण्यासाठी १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. १ मे पासून लसीकरणाला सुरुवात देखील झाली आहे. लसीकरणानंतर काही दिवस रक्तदान करता येणार नसल्याने अडचण निर्माण झाली होती. मागील वर्षीपासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे रक्तदान शिबिरांवर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. 

ठळक मुद्दे‘एनबीटीसी’च्या नवीन मार्गदर्शक सूचना : डॉक्टरांचा घ्या सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी व्यापक स्तरावर लसीकरण केले जात आहे. मात्र, लसीकरणानंतर २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येणार नसल्याच्या सूचना ‘एनबीटीसी’ने जारी केल्या होत्या. त्यामुळे रक्तदान शिबिरांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान, गुरुवारी ‘एनबीटीसी’ने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून त्यानुसार लस घेतल्यानंतरसुद्धा १४ दिवसांनी लसीकरण करता येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, त्याला प्रतिबंध लावण्यासाठी १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. १ मे पासून लसीकरणाला सुरुवात देखील झाली आहे. लसीकरणानंतर काही दिवस रक्तदान करता येणार नसल्याने अडचण निर्माण झाली होती. मागील वर्षीपासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे रक्तदान शिबिरांवर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. परिणामी, रक्तपेढ्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, गरजूंना वेळीच रक्त मिळणे कठीण झाले आहे. जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तसंकलन पेढीतून दररोज ३० ते ३५ रुग्णांना रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. सिकलसेल, थैलिसिमीया, रक्तक्षय असलेल्या रुग्णांना रक्ताचा पुरवठा करणे गरजेचे असून रक्ताची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे, तर रक्त संकलनाचे प्रमाण अत्यल्प असून कसे तरी रक्तदान शिबिर घेऊन रक्त संकलन केले जाते. आता कोरोनाची लस घेणाऱ्या व्यक्तीला त्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येणार नसल्याचे एनबीटीसी म्हटले होते. मात्र, आता यासंदर्भात नवीन सूचना जारी केल्या असून त्यानुसार लस घेतल्यानंतर १४ दिवसांनी लसीकरण करता येणार आहे.  

युवकांनी पुढाकार घेणे गरजेचेरक्तदात्यांमध्ये जिल्ह्यात ४५ ते ५० वर्षे वयोगटांतील खूप लोक आहेत. ते आता लस घेत असल्याने त्यांना पुढचे १४ दिवस रक्तदान करता येणार नाही. अशात त्यांनी आपली सामाजिक जबाबदारी समजून लस घेण्यापूर्वी रक्तदान करणे गरजेचे आहे. लस घेण्याच्या तयारीत असलेल्या लोकांनी आधी रक्तदान करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.   

कोरोनामुळे रक्तदान नाहीच्याच बरोबर होत आहे. सामाजिक जाणीव असलेल्या तरुणांनी पुढे येऊन रक्तदान केले. त्यामुळे रक्ताची मागणी असणाऱ्या रुग्णांचा जीव वाचविता आला. आता कोरोनाचे लसीकरण होत आहे. या लसीकरणासाठी कोरोनाची प्रतिबंधित लस घेणाऱ्यांना १४ दिवस रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे लस घेण्यापूर्वीच रक्तदान करावे.- डॉ. नरेश तिरपुडे, अधिष्ठाता, मेडिकल.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसBlood Bankरक्तपेढी