गोंदिया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १७ आॅक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते बिरसी विमानतळावर जलयुक्त शिवार अभियान पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, भाजपा प्रदेश प्रवक्ता गिरीश व्यास, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित होते. विमोचन करण्यात आलेल्या पुस्तिकेमध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडलेल्या ९४ गावांची माहिती तसेच या गावातील पाण्याची गरज, करण्यात आलेल्या विविध कामांचे, कार्यक्रमाचे छायाचित्र, शेतकऱ्यांचे मनोगत, पाच गावाच्या यशोगाथांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)
जलयुक्त शिवार पुस्तिकेचे विमोचन
By admin | Updated: October 20, 2015 02:37 IST