शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अटी शिथील करून वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:11 IST

महाराष्ट्र शासनाद्वारे शिक्षकांकरिता वरिष्ठ श्रेणी (१२ वर्ष) व निवड श्रेणी (२४ वर्ष) सुधारित योजनेनुसार देत असल्यामुळे शिक्षकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. करिता अटी शिथील करुन शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक परिषदेने केली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र शिक्षक परिषद : उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाद्वारे शिक्षकांकरिता वरिष्ठ श्रेणी (१२ वर्ष) व निवड श्रेणी (२४ वर्ष) सुधारित योजनेनुसार देत असल्यामुळे शिक्षकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. करिता अटी शिथील करुन शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक परिषदेने केली आहे. याकरिता परिषदेच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व ज्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा या प्रगत शाळा व शाळा सिद्धी प्रमाणे ‘ए’ ग्रेड आहेत. ज्या माध्यमिक शिक्षकांच्या इयत्ता ९ वी व इयत्ता दहावीचा निकाल ८० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यांनाच वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ अनुज्ञेय राहील. त्यानुसार ग्रेड ‘ए’ मध्ये नसणाऱ्या वर्ग ९ वी व १० वीचा निकाल ८० टक्के नसणाºया शिक्षकांवर अन्याय होईल व त्यांचे आर्थिक नुकसान होईल असे निवेदनात नमूद आहे.शिक्षकांना १२ व २४ वर्षांपेक्षा जास्त सेवांतर्गत कालावधी होऊनही वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाची व्यवस्था, मागील दोन वर्षापासून करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत आहे. करिता अटीमध्ये शिथीलता आणण्यात यावी व शिक्षकांचे तसेच वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे व शिक्षकांचे होणारे आर्थिक नुकसान व मानसिक त्रास दूर करावा. सदर वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी नियुक्ती दिनांकापासून अनुक्रमे १२ व २४ वर्षानंतर प्रशिक्षणासंबंधीचे हमीपत्र घेवून लागू करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी धार्मिक यांच्यामार्पत मुख्यमंत्री फडणवीस यांन पाठविण्यात आले. यावेळी शिक्षक परिषदेचे राधेशाम पंचबुद्धे, जिल्हा कार्यवाह गुणेश्वर फुंडे, जिल्हा कोषाध्यक्ष छत्रपाल बिसेन, राजेंद्रसिंह तोमर, आनंद बिसेन, गजानन चंदिवाले, प्रदीप मेश्राम, मंगेश पटले, रोशन जैन उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षक