शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर व व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 21:42 IST

अदानी पॉवर महाराष्ट्र लि. तिरोडातर्फे जागतिक पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात आला. या दरम्यान पर्यावरण जागृती व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा पुनर्वापर, .......

ठळक मुद्देअदानी पॉवर प्लांट : जागतिक पर्यावरण सप्ताह साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अदानी पॉवर महाराष्ट्र लि. तिरोडातर्फे जागतिक पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात आला. या दरम्यान पर्यावरण जागृती व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा पुनर्वापर, महाराष्ट्रातील प्लास्टिक उत्पादन निर्मिती व विक्री तसेच वापरावर बंदी या शासनाच्या अधिसूचनेवर विविध कार्यशाळा घेण्यात आल्या.भारत जागतिक स्तरावर ‘बील प्लास्टिक पोल्युशन’च्या थीमसह जागतिक पर्यावरण दिन २०१८ चे आतिथ्य करीत आहे. अदानी पॉवरच्या वतीने ग्रामीण विद्यार्थी, कामगार व कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात घोषवाक्य व चित्रकला स्पर्धा, पर्यावरणाचे मॉडेल व क्वीज स्पर्धांचा समावेश होता.प्लास्टिक कचºयाचे पुनर्वापर व व्यवस्थापन या विषयावर जागरूकता कार्यक्रम तिरोडा नगर परिषदेत घेण्यात आला. यात ट्रेडर्स असोसिएशन, नगर परिषद कर्मचारी, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला. जागरूकता सत्रादरम्यान मालेगावमधील वक्ते स्वप्नील कोठारी, देशमुख, सांगलीचे संदीप चव्हाण यांनी प्लास्टिक पुनर्वापर प्रक्रियेबद्दल विविध नवीन तंत्रज्ञान व माहिती दाखविली. तसेच प्लास्टिक कचऱ्यामधून बनविलेल्या विटा व टाईल्सचे प्रदर्शन केले.अदानी पॉवर महाराष्ट्र लि.तर्फे ‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापन’ चर्चासत्रासाठी निरी नागपूरचे वैज्ञानिक तथा प्रमुख डॉ. अतुल वैद्य यांना वक्ते म्हणून आमंत्रित केले होते. या वेळी गाव प्रतिनिधी सरपंच व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यात डॉ. वैद्य यांनी, कचरा स्त्रोत अलिप्तनाबाबत आपला दृष्टिकोण मांडला. त्यांनी राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी अधिसूचनेनवर सहभागी लोकप्रतिनिधींना माहिती दिली.समारोपीय कार्यक्रमात प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी जी.एम. तळपाडे, न.प. मुख्याधिकारी विजय देशमुख, स्टेशन हेड सी.पी. शाहू तसेच अदानी समुहाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अदानी पॉवरचे पर्यावरण प्रमुख अरूण प्रतापसिंग यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्व व प्लास्टिक कचऱ्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम यावर प्रकाश टाकला. शाहू यांनी, वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षण यावर मत व्यक्त केले. तसेच वृक्षारोपणाबाबत भारताची तुलना विकसित देशांशी केली.मुख्याधिकारी देशमुख यांनी, जर प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातील कचरा वेगळा करण्याच्या पद्धतीचा अवलंब केला तर कचरा व्यवस्थापन समस्येचे नक्कीच निवारण होईल, असे त्यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी जी.एम. तळपाडे यांनी घरगुती प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याचा सल्ला दिला. प्लास्टिक कचऱ्यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. आभार नितीन शिराळकर यांनी मानले.महिलांनी तयार केल्या पेपर पिशव्यास्वयंसहायता बचत गटातील महिला व ग्रामीण युवकांसाठी पेपर पिशवी बनविणे यावर कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. प्रशिक्षणात ८० महिला सहभागी झाल्या होता. त्यांनी कागदापासून विविध प्रकारच्या पिशव्या तयार केल्या. घरी वापरण्यासाठी अशा हस्तनिर्मित पिशव्यांचा वापर होवू शकतो व त्यापासून घरात वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक-पॉलिथिन टाळता येवू शकते, असा निर्धारही महिलांनी केला.प्रत्येकाने दोन रोपटे लावावेअदानी पॉवरचे स्टेशन हेड सी.पी. शाहू यांनी, भारतातील प्रत्येक व्यक्तीमागे २८ वृक्ष आहेत. विकसीत देशांमध्ये प्रत्येक व्यक्तिमागे नऊ हजार वृक्ष आहेत. अन्न हे कुणा एकाचे नसून राष्ट्रीय संपत्ती आहे. अन्न वाया घालवू नका. येणाऱ्या पावसाळ्यात प्रत्येकाने दोन रोपटे लावावे. अदानी प्रकल्पाच्या आत २२० हे.आर. जमिनीवर वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे येणाºया काही वर्षात प्रकल्पाच्या आतील तापमान दोन ते तीन अंशांनी खाली येईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी