शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

जिल्ह्यात चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 05:00 IST

हवामान विभागाने पुढील तीन चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यात सोमवार पासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली असून, मंगळवारी सकाळपर्यंत पावसाची संततधार कायम होती. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८१ मिमी पावसाची नोंद झाली. सडक अर्जुनी तालुक्यात सर्वाधिक १५०.७ मिमी पावसाची नोंद झाली असून, घरे आणि गोठ्यांची  सुद्धा पडझड झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात सोमवारपासून पावसाची संततधार कायम असून मंगळवारी (दि.५) सकाळी ११ वाजतापर्यंत जिल्ह्यातील  काही भागात पावसाचा जोर कायम होता. संततधार पावसामुळे तिरोडा, गोरेगाव आणि सडक-अर्जुनी आणि गोंदिया  चार तालुक्यात  अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १५०.७ मिमी  पावसाची नोंद सडक अर्जुनी तालुक्यात झाली आहे. दमदार पावसामुळे  नदी नाले दुथडी भरून वाहत असून, सडक-अर्जुनी तालुक्यातील खजरी-खोडशिवणी,बाम्हणी ते दल्ली हे मार्ग बंद झाले होते.  दोन दिवस झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने पुढील तीन चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यात सोमवार पासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली असून, मंगळवारी सकाळपर्यंत पावसाची संततधार कायम होती. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८१ मिमी पावसाची नोंद झाली. सडक अर्जुनी तालुक्यात सर्वाधिक १५०.७ मिमी पावसाची नोंद झाली असून, घरे आणि गोठ्यांची  सुद्धा पडझड झाली आहे. तिरोडा तालुक्यात १४० मिमी आणि गोरेगाव तालुक्यात १०६ व गोंदिया तालुक्यात ८१.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसामुळे या भागातील नदी नाले दुथडी भरून वाहत असून, काही मार्ग बंद झाले होते. त्यामुळे तीन चार गावांचा संपर्क तालुक्याशी तुटलेला होता. दोन दिवसांच्या पावसाने पावसाची बरीच तूट भरून निघाली असून, रोवणीच्या कामाला वेग आला आहे. तर तलाव व बोड्यांमध्ये सुद्धा पाणी साचले असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

मजुरीचे दर वाढले- जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, रोवणीच्या कामाला वेग आला आहे. एकाच वेळी रोवणीच्या कामाला सुरुवात झाल्याने मजुरांच्या मागणीत वाढ झाल्याने मजुरीचे दर वाढल्याचे चित्र आहे. 

रस्त्यांची झाली पोलखोल - जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून, चार पाच महिन्यापूर्वीच बांधकाम झालेल्या रस्त्यांची वाट लागली आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊस