शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा पंचायत समितीला अनियमिततेचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 21:53 IST

पंचायत समितीतंर्गत घरकुल, मनरेगासह विविध योजना राबविल्या जात आहे. मात्र तिरोडा पंचायत समितीत मागील काही दिवसांपासून लाभार्थ्यांची कामे होत नसल्याचीे ओरड आहे. तसेच लक्ष्मी दर्शन झाल्यास त्वरीत कामे मार्गी लावली जात असल्याचा आरोप तालुक्यातील लाभार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करुन संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाही करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देलक्ष्मीदर्शनाशिवाय कामे होत नसल्याचा आरोप : कामासाठी लाभार्थ्यांची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : पंचायत समितीतंर्गत घरकुल, मनरेगासह विविध योजना राबविल्या जात आहे. मात्र तिरोडा पंचायत समितीत मागील काही दिवसांपासून लाभार्थ्यांची कामे होत नसल्याचीे ओरड आहे. तसेच लक्ष्मी दर्शन झाल्यास त्वरीत कामे मार्गी लावली जात असल्याचा आरोप तालुक्यातील लाभार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करुन संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाही करण्याची मागणी केली आहे.केंद्र व राज्य सरकारची राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मजुरांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. ही योजना पहिल्यांदा दुष्काळग्रस्त गावात व जिल्ह्यात राबविली जात होती. पण केंद्र सरकारने कायदा तयार करुन ही योजना सर्वत्र लागू केली. रस्ते, पांदन रस्ते, नाला सरळीकरण, तलाव खोलीकरण, वृक्ष लागवड, घरकुल मंजुरी, जनावरांचे गोठे, कुकुट पालन शेड, सिमेंट रस्ते, शेततळे, रोपवाटीका, नाली, अनेक कामे केली जातात. मात्र तालुक्यात सुरू असलेल्या या सर्व कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे. मग्रारोहयो अंतर्गत कामे अंदाजपत्रकानुसार करण्यात आली नाही. बाहेरील एजंसी किंवा अधिकारी, कनिष्ठ अभियंत्याच्या माध्यमातून या कामाचे मुल्याकंन केल्यास यातील मोठे गौडबंगाल पुढे येण्याची शक्यता आहे. नाला सरळीकरण, तलाव खोलीकरण, मुरुम, सिमेंट रस्ते, पांदण रस्ते, वृक्ष लागवड यात बोगस मोजमाप करण्यात आल्याचा आरोप आहे. मजुरांनी काम कमी केले असताना प्रत्यक्षात कागदावर अधिक काम दाखविण्यात आले आहे. सिमेंट रस्त्याची कामे ही कंत्राटदार मार्फत करण्यात आली असून कामाच्या हजेरी रजिस्टरवर बोगस मंजुरांची नोंद करण्यात आली आहे.जनावरांचे गोठे नियम व यादीनुसार न करता काही ग्रामसेवकांनी हितसंबंध जोपासून तयार केल्याचा आरोप आहे.या कामांचे अंदाज पत्रक दोन वर्षांपासून धूळ खात पडले आहे. ज्यांच्याकडून लक्ष्मीदर्शन झाले त्यांची कामे प्राधान्याने करण्यात आली.घरकुलांचे देयक कित्येक लाभार्थ्यांचे अद्यापही पंचायत समितीत पडले आहे. खैरलांजी येथील नरेंद्र गोंडाणे यांचे घर पूर्ण होऊनही मंजुरी दिली नाही. त्यामुळे त्यांची पंचायत समितीत पायपीट कायम आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांना आपली मजुरी काढण्यासाठी पैसे दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे यासर्व प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाही करण्यासाठी लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. मात्र अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही. यासंपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास बरेच मोठे गौडबंगाल समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.