लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भजन, कीर्तन हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असून याच माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांच्या ज्वलंत समस्यांना वाचा फोडून याकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी (दि.१६) भजन, कीर्तन करुन गोंदिया तिरोडा मार्गावरील मुंडीपार एमआयडीसी चौकात अनोखे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.माजी आ.राजेंद्र जैन,दिलीप बन्सोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, नरेश माहेश्वरी, राजलक्ष्मी तुरकर, तालुकाध्यक्ष बाळकृष्ण पटले, प्रेमकुमार रहांगडाले,जितेंद्र टेंभरे यांच्या नेतृत्त्वात मंगळवारी दुपारी १२ वाजता गोंदिया-तिरोडा मार्गावरील मुंडीपार एमआयडीसी चौकात रास्ता आंदोलन करण्यात आले.या आंदोलनानंतर सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच भजन, कीर्तन सादर करुन जिल्ह्यातील विविध समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात भजन मंडळ सुध्दा सहभागी झाले होते.या आंदोलनासाठी समस्यांना वाचा फोडणारी भजने सुध्दा तयार केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या अनोख्या आंदोलनाने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले.या वेळी दिलेल्या निवेदनातून खैरबंदा जलाशयात धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी देण्यात यावे, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा, पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे वाटप करण्यात यावे, कृषी पंपासाठी शेतकºयांना लागू केलेली सौरपंपाची अट रद्द करावी, एम.आय.डी.सी.तील टीम फॅरो प्रकल्प बंद पडला असल्याने येथे कार्यरत मजूर बेरोजगार झाले असून त्यांना रोजगार उपलब्ध करु द्यावा, संग्रामपूर, हरि तलाव, रानी तलावात खैरबंदा जलाशयातून पाईप लाईनच्या माध्यमातून उर्ध्वनलिका तयार करुन पाणी सोडण्यात यावे, दवनीवाडा तालुका तयार करण्यात यावा, सहेसपूर येथील शेतकºयांना खैरबंदा जलाशयाचे पाणी देण्यात यावे, साईटोला रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, पागंडी जलाशयाच्या माध्यमातून डोंगरगाव, मुंडीपार, सेजगाव, भानपूर येथील शेतकºयांना सिंचनासाठी नियमित पाणी देण्यात यावे, घरकुल लाभार्थ्यांना थकलेले हप्ते त्वरीत देण्यात यावे, धापेवाडा, लोधीटोला, येथे वैनगंगा नदीच्या काठालगत सुरक्षा भिंतीचे बांधकाम करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या नेतृत्त्वात उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले.या आंदोलनात नितीन टेंभरे, कैलाश पटले, प्रदीप रोकडे,अशोक डोंगरे, के.बी.बन्सोड, चाणाक्ष कांबळे, गोविंद बावनकर, हितेशकुमार पताहे, रविकुमार पटले, दुलीचंद चौरीवार, संतोष उके, भोजराज रहांगडाले,चेतना पटले, फुलवंता बिजेवार, सविता टेंभरे, हेमलता बारेवार, सुनिता डोंगरे, ग्यानीराम खोटेले, प्रदीप शहारे, घनश्याम पटले, शामलाल साऊस्कर, दीपक कावडे, प्रकाश मेश्राम, घनश्याम चौधरी, युनुस शेख, ईश्वरी पटले, शैलेश वासनिक यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.खरीपाप्रमाणेच रब्बी धानाला बोनस द्याशासनाने खरीप हंगामातील धानाला प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला. मात्र जिल्ह्यात रब्बी हंगामात सुध्दा मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जात असताना रब्बी हंगामासाठी शासनाने बोनस जाहीर केला नाही. त्यामुळे हा एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय असून रब्बी हंगामातील धानाला बोनस देण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.दुष्काळी परिस्थिती जाहीर कराजिल्ह्यात पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावले आहे.त्यामुळे शासनाने पीक परिस्थितीचा आढावा घेवून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करुन उपाय योजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी केली.
भजन कीर्तनातून फोडली समस्यांना वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:49 IST
भजन, कीर्तन हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असून याच माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांच्या ज्वलंत समस्यांना वाचा फोडून याकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी (दि.१६) भजन, कीर्तन करुन गोंदिया तिरोडा मार्गावरील मुंडीपार एमआयडीसी चौकात अनोखे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
भजन कीर्तनातून फोडली समस्यांना वाचा
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन : उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन