शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

रतनारा ग्रा.पं.ने फेटाळला न.प.चा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

नगर परिषदेकडे स्वत:चे घनकचरा प्रकल्प असणे गरजेचे आहे. मात्र असे असतानाही शंभरी गाठणाºया गोंदिया नगर परिषदेकडे प्रकल्प काय तर अद्याप प्रकल्पासाठी जागाच नसणे ही शोकांतिका आहे. परिणामी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून मोक्षधाम परिसर तसेच शहरा लगत ग्रामीण भागात कचरा टाकला जात असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देग्रामसभेत गावकऱ्यांचा विरोध : घनकचरा प्रकल्पात अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी नगर परिषदेने पाहून ठेवलेली ग्राम रतनारा येथील जागा हातून गेली आहे. प्रकल्पाला जागा देण्याच्या प्रस्तावाला ग्रामसभेने विरोध दशर्वित तसा ठराव घेतला आहे. परिणामी नगर परिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठीचा विषय पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. मात्र नगर परिषद आता अन्यत्र जागा शोधत आहे.नगर परिषदेकडे स्वत:चे घनकचरा प्रकल्प असणे गरजेचे आहे. मात्र असे असतानाही शंभरी गाठणाºया गोंदिया नगर परिषदेकडे प्रकल्प काय तर अद्याप प्रकल्पासाठी जागाच नसणे ही शोकांतिका आहे. परिणामी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून मोक्षधाम परिसर तसेच शहरा लगत ग्रामीण भागात कचरा टाकला जात असल्याचे चित्र आहे. यामुळे मात्र शहरासह ग्रामीण भागातील वातावरण दूषित करण्याचा हा प्रकार सुरू आहे.मागील ४-५ वर्षात स्थापित नगर पंचायत आपले प्रकल्प उभारत असताना गोंदिया नगर परिषद १०० वर्षांत साधी जागा मिळू शकली नाही. हा गंभीर व तेवढाच लज्जास्पद विषय आहे. विशेष म्हणजे, गोंदिया नगर परिषदेने कधी टेमनी, कधी रापेवाडा तर आणखीही जागांचा शोध घेतला आहे. मात्र काहीना काही कारणांमुळे त्यांना यश आले नाही. अशात मागील सुमारे २ वर्षांपूर्वी नगर परिषदेने ग्राम रापेवाडा येथे प्रकल्पासाठी जागा बघून ठेवली होती. मात्र त्यासाठी पाहिजे तसे प्रयत्न झाल्याने हा विषय रेंगाळत चालला होता.अशात ‘लोकमत’ने ग्राम चुरोद परिसरात कचरा टाकला जात असल्याचा प्रकार उघडकीस आणल्याने टास्क फोर्सने नगर परिषदेला १ महिन्याच्या कालावधीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याबाबत नोटीस पाठविली आहे. याची धास्ती घेत नगर परिषद कामाला लागली आहे. मात्र जागेच्या विषयाला घेऊन २६ जानेवारी रोजी रतनारा ग्रामपंचायतने ग्रामसभेत जागेचा प्रस्ताव ठेवला. शहरातील कचरा आपल्या गावात येणार ही बाबच गावकऱ्यांना खटकणारी ठरली व गावकºयांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत विरोधात ठराव घेतला. यामुळे आता रतनारा येथे प्रकल्प उभा करण्याची नगर परिषदेची योजना पूर्णपणे फसली आहे.आता कारंजा येथे जागेसाठी प्रयत्नरतनारा येथील जागेचा विषय संपल्यानंतर आता नगर परिषदेने जवळील ग्राम कारंजा येथील जागेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सुमारे ४-५ एकर जागा यासाठी पाहण्यात आली असून वन विभागाची ही जागा असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता ही जागा मिळणार असल्याचे दिसत आहे. या जागेसाठी कारंजा ग्रामपंचातने विशेष ग्रामसभा बोलाविली असून त्यात हा जागेचा विषय निकाली निघणार आहे.ही जागा मिळाल्यावर नगर परिषदेचा घनकचरा प्रकल्प उभा होणार असे दिसून येत आहे.स्वच्छता विभागाचे हातवरग्राम चुलोद येथे शहरातील कचरा टाकला जात असतानाच स्वच्छता विभागाने तो कचरा आपला नसल्याचे सांगत हातवर केले आहे. चुलोद परिसरात कचऱ्याचे ढिगार लागले असून तेथे नगर परिषदेची गाडी पाहण्यात आली आहे. असे असतानाही नगर परिषद स्वच्छता विभागातील स्वच्छता निरीक्षक ही बाब फेटाळत असून तेथील कचऱ्याची उचल करण्यात आलेली नाही. अशात आता टास्क फोर्सने पुन्हा एकदा नोटीस धाडावी अशी वाट बघितली जात आहे असेच वाटत आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतMuncipal Corporationनगर पालिका