शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सिरेगावबांध परिसरात आढळला दुर्मीळ, छोटा क्षत्रबलाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 05:00 IST

सिरेगावबांध परिसरात पक्षीनिरीक्षणासाठी गेलेल्या चमूला दुर्मीळ छोटा क्षत्रबलाक आढळला. या चमूत दादा राऊत, डॉ. शरद मेश्राम, मिथुन चव्हाण, अरविंद गजभिये, छत्रपाल शहारे आणि गौरव बेलगे यांचा समावेश होता. सिरेगाव तलाव अतिशय विस्तीर्ण असून येथे दरवर्षी शेकडो स्थलांतरित पक्षी येत असतात. त्यात विविध पक्ष्यांसह छोटा क्षत्रबलाक हा पक्षी आढळला. साधारण गेल्या १० वर्षांपासून या परिसरात हा पक्षी दिसून आला नव्हता. १० वर्षे आधी तर नवेगावमध्ये आढळला होता. 

संतोष बुकावनलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया हा ‘तलावांचा जिल्हा’ म्हणून ओळखला जातो. हिवाळ्यात जिल्ह्यातील तलाव, पाणवठ्यांवर विविध देशी-विदेशी पक्षी आढळतात. सिरेगावबांध परिसरात दुर्मीळ, छोटा क्षत्रबलाक हा पक्षी शनिवारी आढळला. पक्षी व निसर्गप्रेमींसाठी ही आनंदाची बाब आहे.हिरवळ गोंदियाच्या वतीने नवेगावबांध परिसरात स्थलांतरित पक्षीनिरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सिरेगावबांध परिसरात पक्षीनिरीक्षणासाठी गेलेल्या चमूला दुर्मीळ छोटा क्षत्रबलाक आढळला. या चमूत दादा राऊत, डॉ. शरद मेश्राम, मिथुन चव्हाण, अरविंद गजभिये, छत्रपाल शहारे आणि गौरव बेलगे यांचा समावेश होता. सिरेगाव तलाव अतिशय विस्तीर्ण असून येथे दरवर्षी शेकडो स्थलांतरित पक्षी येत असतात. त्यात विविध पक्ष्यांसह छोटा क्षत्रबलाक हा पक्षी आढळला. साधारण गेल्या १० वर्षांपासून या परिसरात हा पक्षी दिसून आला नव्हता. १० वर्षे आधी तर नवेगावमध्ये आढळला होता. तेव्हापासून या पक्ष्याचा ठावठिकाणाचा कुठेही उल्लेख नव्हता. सिरेगाव परिसरात हा पक्षी दिसल्याने  निसर्गप्रेमींच्या आनंदात मोलाची भर पडली आहे. 

पक्षी अभयारण्याची मान्यता द्यानवेगावबांध व्याघ्र प्रकल्प आहे. येथे अनेक पर्यटक येतात. या परिसरात विविध जातींचे दुर्मीळ पक्षी आवर्जून दिसतात. हे पक्षी अभयारण्य घोषित झाल्यास पर्यटकांच्या व पक्षी अभ्यासकांसाठी ही एक पर्वणीच ठरेल. स्थलांतरित पक्षी हे खाद्य व सुरक्षितता या दृष्टीने येथे मोठ्या संख्येत येतात.                  - प्रा डॉ. शरद मेश्राम, पक्षीप्रेमी

 ही आहेत या पक्ष्याची वैशिष्ट्ये- छोटा क्षत्रबलाक पक्षी असुरक्षित किंवा चिंताजनक या वर्गवारीमध्ये असून तो अतिशय दुर्मीळ असल्याचे सांगितले जाते. नदी, तलाव, गोड्या पाण्याचे जलाशय, चिखलाचा प्रदेश या भागांत साधारणपणे तो आढळतो. याची लांबी ८७ ते ९३ सेंटिमीटर असून त्याचे वजन ४ किलो ते पावणेसहा किलो एवढे असते. त्याची उंची ११० ते १२० सेंटीमीटर असते. त्याच्या पंखांचा विस्तार ५.७५ ते ६६ सें.मी. एवढा असतो. त्याच्या मानेचा रंग पिवळसर व केशरी असून, त्याच्या मानेवर विखुरलेले पंखांचे केस असतात. पंखांचा रंग राखाडी असून पोटाचा भाग पांढरा असतो. त्याचे पाय राखाडी रंगाचे असतात. जानेवारी ते जुलै हा त्याचा प्रजनन काळ असतो. प्रजनन काळाच्या व्यतिरिक्त तो एकट्यानेच राहणे पसंत करतो. मासे ,बेडूक, सरपटणारे प्राणी, उंदीर, लहान सस्तन प्राणी हे त्याचे खाद्य आहे.

 

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य