शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:09 IST

उपचार करण्याच्या नावावर सामान्य लोकांची फसवणूक करून प्रौगंडावस्थेतील मुलीवर अत्याचार करणाऱ्या ढोंगी बाबाचा पर्दाफाश गोंदियात झाला. सात दिवस उपचारासाठी बंद घरात डांबून ठेवलेल्या एका १७ वर्षाच्या मुलीवर त्या ढोंगी बाबाने सतत पाच दिवस अत्याचार केला.

ठळक मुद्देसतत पाच दिवस अतिप्रसंग : नातेवाईकांच्या समोरच करीत होता अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उपचार करण्याच्या नावावर सामान्य लोकांची फसवणूक करून प्रौगंडावस्थेतील मुलीवर अत्याचार करणाऱ्या ढोंगी बाबाचा पर्दाफाश गोंदियात झाला. सात दिवस उपचारासाठी बंद घरात डांबून ठेवलेल्या एका १७ वर्षाच्या मुलीवर त्या ढोंगी बाबाने सतत पाच दिवस अत्याचार केला. त्या ढोंग्याला आता तुरूंगाची हवा खावी लागली.गोंदिया शहरातील एका कुटुंबातील महिला मंडळी आरोग्याबाबत त्रस्त होती. त्यातच त्यांच्या घरातील एका १७ वर्षाच्या मुलीच्या छातीला गाठ आल्याने ती गाठ दुरूस्त करून देण्याचा दावा फुलचूर येथील लंकेश उर्फ वामनराव मेश्राम (३०) या ढोंगी बाबाने केला. त्यामुळे त्याला उपचारासाठी २७ मार्चला बोलाविण्यात आले. त्याने उपचाराच्या नावावर घरातील सर्व मंडळींना काळ्या रंगाची एक गोळी खायला दिली.त्या गोळीमुळे सर्वांना गुंगी यायची. त्या सर्व गुंगीत असताना आरोपी १७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करायचा. २७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उपचाराच्या नावावर त्याने त्या पीडित मुलीलाच नव्हे तर घरात उपस्थित सर्व मंडळींना काळ्या रंगाची गुंगी आणणारी औषधी देण्याचे काम त्याने केले. त्यानंतर गुंगीत झिंगत असलेल्या त्या पीडितेच्या नातेवाईकांसमोरच त्याने सतत पाच दिवस तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिची मावशीही त्या पीडितेच्या घरी असल्याने तिलाही गुंगीचे औषध दिले होते.त्यामुळे तिची मावशी सुध्दा त्याच खोलीत बसून होती. तिच्या डोळ्यासमोर पीडितेवर अत्याचार केला. परंतु त्याचा विरोध कुणीच करू शकले नाही. त्या घरात सात दिवस सात माणसांना ढोगीं बाबाने गुंगीचे औषध दिले. सातपैकी ८-८ वर्षाची दोन मुले व पाच महिला-मुली होत्या. ३१ मार्चला त्याने तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केला. परंतु त्यात तो यशस्वी झाला नाही. १ ते ४ एप्रिल दरम्यान दररोज चार दिवस त्याने तिच्यावर बळजबरी केली.असे आले प्रकरण उघडकीसपीडितेचे वडील व काका कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. काका बाहेगावावरून आल्यानंतर आपल्या पत्नीला बोलाविण्यासाठी पीडितेच्या घरी गेले. परंतु त्या घराला बाहेरून कुलूप लावले होते. ते कुठे गेले यासंदर्भात शेजाऱ्यांना विचारणा केली असता आठवडाभरापासून कुलूप बंदच असल्याचे सांगण्यात आले. परंतु लोक आत आहेत असेही सांगण्यात आले. त्यांनी त्यावर त्या घराचे कुलूप तोडले. त्यावेळी सर्व लोक गुंगीत घरातील कानाकोपऱ्यात झिंगून पडले होते. आरोपी देखील एका कोपºयात पडून होता. लोक गोळा झाले आणि हे प्रकरण उघडकीस आले.नागरिकांनी दिला चोपबंद घरात सात लोकांना गुंगीचे औषध देऊन एका १७ वर्षाच्या मुलीवर चार दिवस सतत अत्याचार करणाºया नराधमाला त्या पीडितेच्या घराजवळील लोकांनी चांगलाच चोप दिला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या त्या नराधमाला उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करावे लागले.भंडाऱ्याच्या तुंरुगात रवानगीपीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी गोंदिया शहर पोलिसात ५ एप्रिलला तक्रार करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ३७६ (२) (जे) (एन), ३४२, ५०६ सहकलम ४, ६ बाललैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला होता. परंतु लोकांनी त्याला चांगलाच चोप दिल्यामुळे त्याला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. ९ एप्रिल रोजी त्याला पोलीस उपनिरीक्षक संदीया सोमनकर यांनी अटक केली. न्यायालयाने ९ ते १५ एप्रिल दरम्यान पोलीस कोठडी सुनावली. आता त्याला भंडाºयाच्या कारागृहात रवाना करण्यात आले आहे.

टॅग्स :Rapeबलात्कार