शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ रानडुकराला गावकऱ्यांनी केले ठार

By admin | Updated: August 27, 2014 23:41 IST

तीन वर्षांपासून बरबसपुरा आणि काचेवानीच्या हद्दीत असलेल्या नागरी वसाहतीत रात्रीच्या वेळी रानडुकरांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातून धान्य, खुरण आदींची नासाडी होत असल्याचे निदर्शनास आले होते.

चार लोक जखमी : गावात शिरुन केलेल्या हल्ल्याने दहशतकाचेवानी : तीन वर्षांपासून बरबसपुरा आणि काचेवानीच्या हद्दीत असलेल्या नागरी वसाहतीत रात्रीच्या वेळी रानडुकरांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातून धान्य, खुरण आदींची नासाडी होत असल्याचे निदर्शनास आले होते. मात्र भर दिवसा रानडुक्कर गावात शिरून लोकांना जखमी केल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. तान्हा पोळा असल्यानेच बरबसपुरा येथील रानडुकराच्या हल्ल्यातून अनेकजण बचावले तर चार जण जखमी झाले. संपूर्ण गावकऱ्यांनी अखेर एक तासाच्या प्रयत्नानंतर त्या रानडुकराला ठार करण्यात यश मिळविले.काचेवानी परिसरातील बरबसपुरा गावाला लागून असलेले क्षेत्र तीन वर्षांपासून जंगली व हिंसक जनावरांमुळे असुरक्षित झालेले आहे. मध्यरात्री घरालगत येवून धान्याची नासाडी करणे, घराच्या वाडीत व अंगणात असलेल्या जमिनीतील कंद उपसून खाणे असे प्रकार सुरू होते. डुकरांच्या उपद्रवाने पिकांची नासाडी आणि नागरिक असुरक्षित असल्याच्या बातम्याही लोकमतने अनेक वेळा प्रकाशित केल्या. नासाडीचे प्रकरण वन विभाग तिरोडा यांना सादर करण्यात आले आहेत. डुकरांच्या भटकंतीतून होत असणाऱ्या नासाडीबद्दल वनविभागाने लक्ष केंद्रित करुन नुकसान थांबविण्याचे प्रयत्न करावे, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात आली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले.तान्हा पोळा व मारबत असल्याने बरबसपुरा येथील चौकाचौकात लोकांची गर्दी होती. दुपारी ४ वाजता रानडुकराने गावाकडे धाव घेऊन एका महिलेच्या घरी प्रवेश केला आणि तिच्या मांडीच्या भागाला जोरदार चावा घेतला. जखमी महिलेचे नाव साखरन येळे (५५) सांगण्यात आले. गावातील नागरिकांचा हल्ला होताच घर आवारात उपस्थित असलेल्या महेंद्र भैरव परिहार (४०) याला खाली पाडले. त्याच्या छातीला मार लागून हातही फॅक्चर झाले. शालिकराम यादवराव कटरे (६०) हेसुद्धा जखमी झाले. त्यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉड, हातोडे व कुऱ्हाडी घेऊन डुकराचा पाठलाग केला. पळता-पळता रानडुकराने ग्रामपंचायतच्या मागच्या बाजूला असलेल्या झुडूपाचा आश्रय घेतला. त्यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी दगडांसह काठ्या व लोखंडी साहित्याने वार करून एका तासाच्या प्रयत्नात त्या हिंसक डुकराला ठार केले. जखमी झालेल्यांना एकोडी येथील रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. औषधोपचारानंतर घरी पाठविण्यात आले. याची माहिती वन परिक्षेत्राधिकारी चाटी यांना सांगण्यात आली. त्यावेळी त्यांनी आपल्या पथकासह येऊन मृत डुकराचा पंचनामा केला. गंगाझरी पोलीस घटनास्थळी आले. वन परिक्षेत्राधिकाऱ्यांनी मृत डुकराला उत्तरीय तपासणीसाठी तिरोडा येथे नेले. (वार्ताहर)