शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

रौनक वैद्यच्या अपहरणकर्त्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 21:52 IST

सडक-अर्जुनी तालुक्याच्या घटेगाव येथील दुसरीमध्ये शिकणारा विद्यार्थी रौनक गोपाल वैद्य (७) याचे ३ जुलै २०१९ रोजी खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणातील पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देएलसीबीची कारवाई : खंडणीसाठी केले होते अपहरण, घटेगाव येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्याच्या घटेगाव येथील दुसरीमध्ये शिकणारा विद्यार्थी रौनक गोपाल वैद्य (७) याचे ३ जुलै २०१९ रोजी खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणातील पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.३ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास रौनक आपल्या घरातून जिल्हा परिषद शाळा घटेगाव येथे जात होता. दप्तर शाळेत सोडून प्रार्थनेच्या वेळेला शाळेच्या बाहेर खेळत असताना सकाळी ११ ते ११.३० वाजताच्या सुमारास दोन अनोळखी इसमांनी तुला तुझ्या वडिलांनी बोलावले आहे असे खोटे सांगून त्याला जबरदस्तीने अ‍ॅक्टिव्हासारख्या दिसणाऱ्या सोनरी रंगाच्या गाडीवर बसवून नेले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांच्यासोबत शिकणारा त्याच्या घराशेजारी राहणारा त्याचा वर्गमित्र रौनकचा दप्तर घरी घेऊन आला. रौनकला कुणीतरी दोन अनोळखी लोक जबरदस्तीने घेऊन गेले आहे असे त्याच्या आई-वडिलांना सांगितले.त्यानंतर रौनकचे आई-वडिलांनी आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध घेतला असता तो मिळाला नाही. त्यानंतर रौनकचे वडील गोपाल वैद्य यांनी सायंकाळी पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे रौनकच्या अपहरणाची तक्रार केली. डुग्गीपार पोलिसांनी याप्रकरणी भांदवीच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला.पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांनी सदर घटेनेचे गांभीर्य लक्षात घेवून त्वरीत गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी लावून अपहरण झालेल्या मुलाचा तसेच संशयीत इसम व संशयीत वाहन याचा शोध घेण्याचे आदेश दिले. नियंत्रण कक्ष भंडारा यांना देखील याबाबत माहिती देऊन भंडारा जिल्ह्यात देखील नाकाबंदी करण्यात आली होती. त्याप्रमाणे संपूर्ण गोंदिया व भंडारा जिल्ह्यात देखील लगेचच नाकाबंदी करण्यात आली.नाकाबंदी दरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी कडक वाहन तपासणी मोहिम राबविली.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक गोंदिया, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच देवरी उपविभागातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली होती. अखेर आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.तपासासाठी होते पाच पथकविनिता शाहू यांनी घटनास्थळावरील साक्षदार यांच्याकडे विचारपूस करुन परिस्थिती जाणून घेतली. गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने अपहरण झालेल्या मुलाचा व संशयीताचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया, देवरी उपविभागातील अधिकारी व कर्मचारी यांची वेगवेगळी पाच तपास व शोध पथके तयार केली होती. तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या अधिकारी, कर्मचारी यांनी संपूर्ण रात्रभर प्रभावी शोध मोहीम राबविली. सदर घटनेनंतर गोंदिया पोलिसांनी दिलेला प्रतिसाद व प्रभावी शोध मोहीम याचा परिणाम म्हणून संशयीतांनी अपहरण झालेला रौनकला ४ जुलै २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता दरम्यान देवरी तालुक्यातील पुतळी गावाजवळील जंगल परिसरात रस्त्यावर सोडून ते फरार झाले होते.या आरोपींना अटक९ जुलै रोजी सडक-अर्जुनी तालुक्याच्या घटेगाव येथील वैभव प्रकाश वासनिक (२३), शेखर दुलीचंद शेंडे (२३), देवरी येथील प्रविण कैलाश पाटील (२२), राहूल नामाजी गावड (१९), सौरभ बाळकृष्ण गायधने (१९) या पाच जणांना नागपूर येथून वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडण्यात आले.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिस