शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर आचार-विचारांंचे मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:24 IST

आमगाव : प्रभू श्रीराम हे स्वत: धर्माचे प्रतीक आहेत. अयोध्येमध्ये धर्माचे प्रतीक निर्माण होत आहे. धर्म स्थापनेकरिता आता आपण ...

आमगाव : प्रभू श्रीराम हे स्वत: धर्माचे प्रतीक आहेत. अयोध्येमध्ये धर्माचे प्रतीक निर्माण होत आहे. धर्म स्थापनेकरिता आता आपण कार्य करणार आहोत. राम मंदिर आचार- विचारांचे मंदिर बनणार आहे, असे प्रतिपादन महात्यागी संस्थान तिरखेडीचे अध्यक्ष ग्यानीराम महाराज यांनी केले.

श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान आमगाव तालुका कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी उद्‌घाटक म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले की, भव्य मंदिर निर्माण करण्याकरिता नि:संकोच भावनेने दान करावे. सामर्थ्यानुसार दान करावे. हे एक सामाजिक कर्तव्य आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, न्यास निधी समर्पण महाअभियान आमगाव तालुका कार्यालयाचे स्थानिक मानकर चौकात १३ जानेवारीला करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बजरंग दलाचे महाराष्ट्र-गोवा क्षेत्राचे क्षेत्रीय संयोजक देवेश मिश्रा, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर, गिधाडी आश्रमाचे परमपूज्य यशेश्वरानंदजी महाराज, अभियानाचे तालुका संयोजक बंटी शर्मा, महात्यागी संस्थानचे सचिव जे.जी. अंबुले, माजी आमदार भेरसिंह नागपुरे उपस्थित होते. देवेश मिश्रा म्हणाले, श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते. म्हणून, आम्हाला मर्यादा पुरुषोत्तम राजाचा अभिमान आहे. राम मंदिर जनतेच्या सहकार्याने बनणार आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणाकरिता निधीसंग्रह व गृहसंपर्क अभियान १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान करण्यात येणार आहे. संचालन अभियानाचे तालुका सहसंयोजक सुनील अंबुले यांनी केले. प्रांत सहसंयोजक नवीन जैन, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक बालाराम व्यास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाह दिनेश शेंडे, नरेंद्र बाजपेई, भाजपा तालुकाध्यक्ष काशिराम हुकरे, रा.स्व. संघ नगर सहकार्यवाह रमेश सोनी, अशोक शेंडे, मुरलीधर करंडे, जनार्दन तडस, शंकर शेंडे, सुरेश शेंडे, प्रवीण पटले, अतुल साखरकर, चंद्रकुमार पटले, राजेश जगधते, राजू पटेल यांनी परिश्रम घेतले.