शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

शिवसेनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: November 24, 2014 22:59 IST

धान खरेदी करताना शेतकऱ्यांची लूट होऊ नये यासाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर शेतमालाची मोजणी व्हावी यासाठी शिवसेना तालुका अर्जुनी/मोरगावतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

अर्जुनी/मोरगाव : धान खरेदी करताना शेतकऱ्यांची लूट होऊ नये यासाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर शेतमालाची मोजणी व्हावी यासाठी शिवसेना तालुका अर्जुनी/मोरगावतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. येत्या दोन दिवसात इलेक्ट्रॉनिक्स वजनकाट्याने मोजणी करण्यासंदर्भात कारवाई करण्यात येणार, असे आश्वासन तहसीलदार संतोष महाले यांनी दिले. तालुक्यात शासकीय आधारभूत हमी भाव खरेदी केंद्र सुरू झाले. अनेक केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांचा गतवर्षी पुरवठा करण्यात आला. मात्र अनेक धान खरेदी केंद्रांवर जुन्याच वजनकाट्यावर शेतमालाची मोजणी सुरू होती. जुन्या वजनकाट्यांवर मोजणी होत असल्याने धान खरेदी केंद्राना प्रत्येक ५० किलोमागे सुमारे ५ किलो अधिकचे धान मिळत होते. शेतकऱ्यांची ही होणारी लूट थांबविण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेऊन १५ नोव्हेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन देऊन ८ दिवसात सर्वच केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याने मोजमाप प्रक्रिया सुरु करण्याची मुदत दिली होती. या मुदतीत कार्यवाही झाली नाही यासाठी सोमवारला (२४) शिवसेनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. शिवसेना कार्यकर्त्यानी कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात सुरू असलेल्या धान खरेदी केंद्रावर भेट दिली. त्यावेळी त्यांना जुन्या वजनकाट्यावर २ किलो वजन अतिरीक्त आढळून आले. खरेदी केंद्रावर असलेल्या कर्मचाऱ्याने हे पासंग असल्याचे सांगितले. साध्या काट्यावर मोजणी केलेल्या ५० किलो वजनाच्या पोत्याचे इलेक्ट्रॉनिक काट्यावर ५५ किलो वजन आढळून आले. या पध्दतीने ५० किलोवर शेतकऱ्यांची ५ किलो लूट केली जात असल्याचा आरोप करून या केंद्रावरील कर्मचाऱ्यांवरगुन्हा नोंदविण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. याच केंद्रावर सुरू असलेला जुना वजनकाटा काढून इलेक्ट्रॉनिक वजनकाटा बसविण्यास शिवसैनिकांनी भाग पाडले. यावेळी जिल्हाध्यक्ष शिवहरे, जि.प. सदस्य किरण कांबळे, जिल्हा उपप्रमुख शैलेश जायस्वाल, तालुका प्रमुख संजय पवार, शहर प्रमुख अजय पालीवाल, अरूण मांडगवणे, लैलेश शिवणकर, विजय खुणे, बबन बडवाईक, यादव कुंभरे, सुरेश ठवरे, गजानन शेंडे, प्रकाश उईके, धर्मा शेंडे, गोवर्धन राखडे, अजय पशीने, रवी देशमुख, कमल सयाम, रमेश वाघाडे, दयाराम रहेले, अशोक सयाम, चंद्रकला सोनवाने, कैलाश चुन्ने, विलास वट्टी, अनिल बनकर व कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)