शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

काँग्रेसने काढली नोटबंदीची निषेध रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भ्रष्टाचार व आतंकवादाचा नायनाट करण्याचे कारण सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला १००० व ५०० रूपयाच्या नोटा बंद केल्या आहेत. परंतु भ्रष्टाचार किंवा आंतकवाद संपला नाही. उलट देशाचा विकास दोन टक्क्याने घसरला आहे. लोकांचा रोजगार गेल्याने लोक बेरोजगार झाले. सामान्य जनता त्रस्त झाल्याने ...

ठळक मुद्दे लाखो लोक झाले बेरोजगार : नागरिकांना आले काळे दिन, केंद्र शासनाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भ्रष्टाचार व आतंकवादाचा नायनाट करण्याचे कारण सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला १००० व ५०० रूपयाच्या नोटा बंद केल्या आहेत. परंतु भ्रष्टाचार किंवा आंतकवाद संपला नाही. उलट देशाचा विकास दोन टक्क्याने घसरला आहे. लोकांचा रोजगार गेल्याने लोक बेरोजगार झाले. सामान्य जनता त्रस्त झाल्याने जिल्हा काँग्रेस कमेटीने आज बुधवारी रॅली काढून नोटबंदीचा विरोध दर्शविला आहे.शहराच्या शहीद भोला भवनातून दुपारी १२ वाजता रॅली काढण्यात आली. नोटबंदीचा विरोध करीत ही रॅली शहराच्या मुख्य मार्गावरून भ्रमण करविण्यात आली. शहीद भोला भवनातून गांधी चौक, चांदणी चौक, दुर्गा चौक, गोरेलाल चौक होत गांधी प्रतिमा येथे नेण्यात आली. रॅलीत सहभागी झालेल्यांनी हाताला काळी फित लावून निषेध नोंदविला. नोटबंदीला घेऊन विरोध दर्शविणारे फलक, दुष्पपरिणामाची माहिती देणारे फलक हातात घेतले होते. नोबंदीमुळे ८६ टक्के मुद्रा चलनातून बाहेर केल्या आहेत. चांगल्या दिवसाचे स्वप्न दाखवून सत्तेत येणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरूण जेठली, सुषमा स्वराज, स्मृती ईरानी, मुककेश अंबानी, गौतम अदानी यांना चांगले दिवस आले आहेत. नोटबंदीचा फायदा फक्त भाजपला झाला आहे. नोटबंदीच्या नावावर काळाधन त्यांनी जमा केला आहे. नोटबंदीमुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. नोटबंदीमुळे लघु व मध्यम उद्योग बंद झाले. शेतकरी, व्यापारी व फेरीवाल्यांचे मोठे नुकसान झाले. देश आर्थिक अडचणीत आल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे, असे काँग्रेसचे माजी आ. रामरतन राऊत म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, डॉ. नामदेवराव किरसान, डॉ. योगेंद्र भगत, अमर वºहाडे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष जहीर अहमद, महासचिव अपूर्व अग्रवाल, देवा रूसे, अ‍ॅण्ड. योगेश अग्रवाल, लखन अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले.या मोर्च्यात जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, जि.प.चे माजी अध्यक्ष अ‍ॅण्ड. के.आर. शेंडे, शिक्षण सभापती पी.जी. कटरे, रमेश अंबुले, नगरसेवक शकील मंसुरी, माजी न.प. उपाध्यक्ष राकेश ठाकूर, युवा नेते विशाल अग्रवाल, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, अर्जुनी-मोरगावच्या नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे, सालेकसाचे सभापती हिरालाल फाफनवाडे, आमगावच्या सभापती हेमलता डोये, जि.प. सदस्य विठोबा लिल्हारे, सिमा मडावी, ज्योती वालदे, माधुरी कुंभरे, गिरीश पालीवाल, शेखर पटले, विजय लोणारे, नगरसेवक क्रांती जायस्वाल, सुनिल तिवारी, भागवत मेश्राम, पराग अग्रवाल, व्यंकट पाथरू, डॉ. झामसिंग बघेले, यादनलाल बनोटे, राधेलाल पटले, योजना कोतवाल, संदीप रहांगडाले, धनलाल ठाकरे, प्रकाश रहमतकर, धिरेश पटेल, डॉ.विवेक मेंढे, सहेषराम कोरोटे, राजेश नंदागवळी, निलू बागडे, पन्नालाल शहारे व इतर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.भारिपने पाळला काळा दिवसगोंदिया : भारत सरकारने वर्षभरापूर्वी १००० व ५०० च्या नोटा बंद केल्यामुळे भारिप बहुजन महासंघाने ८ नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. नोटबंदीचा विरोध करून यासंदर्भात उपविभागीय अनंत वालस्कर यांना निवेदन देण्यात आले.निवेदन देणाºया शिष्टमंडळात सुरेंद्र खोब्रागडे, उमराव गजभिये, डॉ. डी.बी.डहाट, डॉ.रमेश रामटेके, गुलाबराव बांबोळे, प्रदीप वासनिक, सुनिल मेश्राम, कृष्णलाल शहारे, गौतम रामटेके, प्रा.वाय.एस. तागडे, एस. आर. चौरे, सी.आर.मेश्राम यांचा समावेश होता.मोदींचे एकच वचन चालणार नाही काळेधनगोंदिया शहरासह जिल्ह्याच्या सर्व तालुका मुख्यालयी भाजपकडून नोटबंदीला एकवर्ष पूर्ण झाल्यामुळे कालाधन विरोधी दिवस साजरा करण्यात आला. देवरी, अर्जुनी मोरगाव, आमगाव, गोरेगाव, सालेकसा, तिरोडा येथे भाजपतर्फे नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे उत्सव साजरा करण्यात आला. आमगावात भाजपतर्फे नरेंद्र मोदींनी दिले वचन, चालणार नाही काळे धन असे नारे दिले. सडक-अर्जुनी तालुक्यात नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाले व भ्रष्टाचार निर्मूलन दिन तालुकाध्यक्ष अध्यक्ष विजय बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाने, लक्ष्मीकांत धानगाये उपस्थित होते.जि.प. च्या सामान्य सभेत श्रद्धांजलीगोंदिया: गोंदिया जिल्हा परिषदेवर भाजप व काँग्रेस यांच्या अभद्र युतीची सत्ता आहे. ८ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेची सर्व सामान्य सभा होती. या सभेत वर्षश्राध्द करीत एक हजार व ५०० रूपयाच्या नोटाबंदीच्या वेळी मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर यांनी सर्वसाधारण सभा सुरू होण्याच्या पूर्वी सभागृहाला विनंती करून नोबंदीच्या काळात जया निष्पाप लोकांचा बळी गेला त्या लोकांना श्रध्दांजली वाहण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला शिक्षण सभापती पी.जी. कटरे यांनी समर्थन दर्शविले. यावेळी सभागृह सुरू होण्यापूर्वी दोन मिनीटे मौन राखून श्रद्धांजली वाहण्यात आली. नोटबंदी झालेला ८ नोव्हेंबर हा काळा दिवस ठरल्याचे शिक्षण सभापती पी.जी. कटरे यांनी सभागृहात म्हटले. नोटबंदीमुळे सामान्य नागरिकांचे नुकसान झाले, असे जि.प.चे विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर यांनी म्हटले. या श्रद्धांजली कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाजपचे सर्व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते