लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दलित आदिवासींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध लावा, वनहक्क जमिनीचे पट्टे द्या, पेशंनचा कायदा तयार करा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेत मजदूर युनियनच्या नेतृत्त्वात गुरूवारी (दि.९) दुुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले.महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेत मजदूर युनियनचे जिल्हाध्यक्ष हौसलाल रहांगडाले यांच्या नेतृत्त्वात गुरूवारी दुपारी १२ वाजता येथील जयस्तंभ चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्च्या काढण्यात आला. दलित आदिवासींवरील अत्याचार बंद करा, अत्याचार करणाºयाविरुध्द त्वरीत कडक कारवाही करण्यात यावी, अतिक्रमण दावेदारांना वनधिकार कायद्याखाली अतिक्रमण जमिनीचे पट्टे देण्यात यावे. घरकुल बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन द्या, ६० वर्षावरील शेतमजूर, ग्रामीण कारागीर, शेतकरी यांना दरमहा पाच हजार रुपये पेशंन देण्यात यावे. श्रावणबाळ, संजय निराधार, विधवा, परितक्त्या, दिव्यांगांना दरमहा अर्थसहाय्य करण्यात यावे. आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.शिष्टमंडळात शेखर कनोजिया, प्रल्हाद उके, चरणदास भावे, डोमाजी बावनकर, रायाबाई मारगाये, छन्नू रामटेके, रामचंद मानकर, ताराचंद डोमळे, मिलिंद गणवीर आदींचा समावेश होता.
शेतमजुरांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 22:08 IST
दलित आदिवासींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध लावा, वनहक्क जमिनीचे पट्टे द्या, पेशंनचा कायदा तयार करा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेत मजदूर युनियनच्या नेतृत्त्वात गुरूवारी (दि.९) दुुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले.
शेतमजुरांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मागण्या मार्गी लावण्याची मागणी