शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा तहसील कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:00 IST

तालुका काँग्रेस पक्षातर्फे शासनाकडून जनसामान्य नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात शुक्रवारी (दि.२३) येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार साहेबराव राठोड यांना देण्यात आले.

ठळक मुद्देसहेषराम कोरोटे : न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा

ऑनलाईन लोकमतआमगाव : तालुका काँग्रेस पक्षातर्फे शासनाकडून जनसामान्य नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात शुक्रवारी (दि.२३) येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार साहेबराव राठोड यांना देण्यात आले.जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव सहेषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात येथील आंबेडकर चौकातून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या वेळी शिष्टमंडळातर्फे विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे तहसीलदार राठोड यांना देण्यात आले.निवेदनातून तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार पिडित शेतकरी, शेतमजूर व सर्व सामान्य जनतेसाठी केंद्र व राज्य शासनाने कुठल्याही नवीन योजना काढल्या नाही. तर पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी.तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, पीक विमाधारक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यात यावी. कृषी पंपधारक शेतकºयांचे विद्युत बिल माफ करावे, आमगाव तालुक्यातील गावांमध्ये रोजगार हमीची कामे सुरु करुन मजुरांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, खनन उत्खनन बाबतचे परिपत्रक रद्द करावे, दुष्काळ कर आकारणी बंद करणे, बेरोजगारांना शासकीय सेवेत समाविष्ठ करावे, तालुक्यात उद्योग धंदे उभारण्यात यावे, १५ लाख रुपये जनधन खात्यात जमा करावे आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, राजकुमार फुंडे, इशुलाल भालेकर, राधाकिसन चुटे, संजय डोये, दिगंबर कोरे, हुकुमचंद बहेकार, यादनलाल बनोठे, डॉ. राजकुमार चुटे, अजय खेतान, सरपंच उषा भांडारकर, संजय बहेकार, बळीराम कोटवार, दिलीप बैस, रवि अग्रवाल, महेश उके, लोकेश अग्रवाल, राजा मिश्रा, दिपक शर्मा, गणेश हुकरे, आनंद शेंडे, बंशीधर अग्रवाल, खेमचंद खोब्रागडे, प्रभादेवी उपराडे, नरेश बोपचे, आशिष टेंभुर्णे, रितेश रामटेके यांचा समावेश होता.