शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस सरासरी गाठतोय पण दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 05:00 IST

मागील दोन दिवसांच्या कालावधीत विदर्भात पावसाने सर्वत्र हजेरी लावली. काही जिल्ह्यांत अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला. मात्र गोंदिया जिल्ह्यात मागील दोन महिन्यांच्या कालावधीत पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी-नाल्यांना एकदाही पूर आला नाही. परिणामी, सिंचन प्रकल्प, तलाव, बोड्यांमध्येसुद्धा मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. 

ठळक मुद्देरोवणीला आला वेग : मात्र सिंचन प्रकल्पात मोजकाच साठा

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : तब्बल पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीनंतर जिल्ह्यात पावसाने दोन दिवस हजेरी लावली. त्यामुळे रोवणीच्या कामाला वेग आला आहे. तर अधूनमधून पाऊस हजेरी लावत असल्याने पावसाने सरासरी जरी गाठली असली तरी अद्यापही पाहिजे तसा पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.मागील दोन दिवसांच्या कालावधीत विदर्भात पावसाने सर्वत्र हजेरी लावली. काही जिल्ह्यांत अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला. मात्र गोंदिया जिल्ह्यात मागील दोन महिन्यांच्या कालावधीत पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी-नाल्यांना एकदाही पूर आला नाही. परिणामी, सिंचन प्रकल्प, तलाव, बोड्यांमध्येसुद्धा मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात १ जून ते २४ जुलै या कालावधीत ५१४.० मिमी पाऊस पडतो. यंदा याच कालावधीत ४६४.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच आतापर्यंत सरासरीच्या ९०.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. म्हणजे १० टक्के पावसाची तूट अजूनही कायम आहे. जुलै महिना संपण्यास पाच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. तर ऑगस्ट महिन्यापासून पाऊस कमी होतो. यंदा आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्केच रोवण्या झाल्या आहेत. तर ७० टक्के रोवण्या शिल्लक आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकऱ्यांच्या रोवण्या आटोपल्या आहेत. पण वर थेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा हवामान विभागाचा अंदाज सुरुवातीपासूनच फोल ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडली आहे. 

५५ हजार हेक्टरवर राेवण्या पूर्ण यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८१ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. यापैकी २४ जुलैपर्यंत ५५ हजार हेक्टरवर धानाची रोवणी पूर्ण झाली असून, अजून १ लाख २६ हजार हेक्टरवरील रोवण्या होणे शिल्लक आहे. त्यामुळे रोवणीला वेग येण्यासाठी शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती