शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

२० महिन्यांत १.१३ कोटी सामान्यजनांचा रेल्वे प्रवास

By admin | Updated: December 21, 2014 23:01 IST

गोंदिया रेल्वे स्थानकातून मागील २० महिन्यांत १ कोटी १३ लाख ६८ हजार ५७७ सामान्य तिकीटधारक प्रवाशांनी रेल्वेच्या विविध गाड्यांमधून प्रवास केल्याची नोंद आहे. यात सन २०१३-१४ दरम्यान

देवानंद शहारे - गोंदिया गोंदिया रेल्वे स्थानकातून मागील २० महिन्यांत १ कोटी १३ लाख ६८ हजार ५७७ सामान्य तिकीटधारक प्रवाशांनी रेल्वेच्या विविध गाड्यांमधून प्रवास केल्याची नोंद आहे. यात सन २०१३-१४ दरम्यान ६८ लाख ३४ हजार ००१ प्रवासी व सन २०१४-१५ च्या नऊ महिन्यांत ४५ लाख ३४ हजार ५७६ प्रवाशांनी प्रवास केला. त्याद्वारे गोंदिया रेल्वे स्थानकाला ४१ कोटी ८३ लाख ६४ हजार १५० रूपयांचे उत्पन्न मिळाले. गोंदिया रेल्वे स्थानकातून दरदिवशी जवळपास १९ ते २० हजार प्रवाशी बाहेरगावी जातात तर एवढेच प्रवाशी बाहेरून येतात. गोंदिया रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांची निश्चित संख्या उपलब्ध होऊ शकत नाही. परंतू गोंदियातून जेवढे प्रवाशी तिकिटा घेऊन बाहेर जातात, त्यांची संख्या गोंदिया रेल्वे स्थानकात उपलब्ध आहे. त्या संख्येनुसार, गोंदियातून एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या कालावधीत ६८ लाख ३४ हजार ००१ प्रवाशांनी सामान्य श्रेणीची तिकिटे घेऊन प्रवास केला. त्याद्वारे गोंदिया स्थानकाला २३ कोटी ८७ लाख ७२ हजार ४५५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत ४५ लाख ३४ हजार ५७६ प्रवाशी गोंदिया स्थानकातून बाहेर गेले. या सामान्य श्रेणीच्या तिकिटांद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटांतून गोंदिया स्थानकाला १७ कोटी ७५ लाख ९१ हजार ६९५ रूपयांचे उत्पन्न मिळाले.मागील २० महिन्यांत गोंदिया स्थानकातून एकूण एक कोटी १३ लाख ६८ हजार ५७७ सामान्य श्रेणीच्या तिकिटांची विक्री झाली. स्थानकाला त्याद्वारे ४१ कोटी ८३ लाख ६४ हजार १५० रूपयांचे उत्पन्न मिळाले. यात आरक्षित तिकिटांची विक्री व त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश करण्यात आला नाही. अन्यथा सदर उत्पन्न अधिक असते.मागील नऊ महिन्यांच्या संख्यांवर लक्ष दिल्यास, जानेवारीत पाच लाख ६३ हजार ३९०, फेब्रुवारीत पाच लाख नऊ हजार ४९४, मार्चमध्ये पाच लाख ४६ हजार ३२६, एप्रिलमध्ये पाच लाख ६९ हजार ७६५, मेमध्ये सहा लाख ४६ हजार ४६९, जूनमध्ये पाच लाख ७४ हजार ७४२, जुलैमध्ये चार लाख ९७ हजार ८५५, आॅगस्टमध्ये पाच लाख ४२ हजार ३९२, सप्टेंबरमध्ये पाच लाख ५२ हजार ८००, आॅक्टोबरमध्ये पाच लाख ६० हजार ०२७ व नोव्हेंबरमध्ये पाच लाख ९० हजार ५२६ प्रवाशांनी सामान्य श्रेणीच्या तिकिटा गोंदिया रेल्वे स्थानकातून खरेदी केल्या आहेत.एवढ्या मोठ्या प्रमाणात गोंदिया स्थानकातून तिकिटांची विक्री होत आहे. परंतू गोंदिया स्थानकातून प्रवाशांना काही विशेष सुविधा उपलब्ध करवून दिल्या जात नाही, अशा रेल्वे प्रवाशांच्या नेहमीच तक्रारी असतात. उल्लेखनिय म्हणजे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात नागपूरनंतर सर्वाधिक उत्पन्न देणारे गोंदिया रेल्वे स्थानक आहे. परंतू या स्थानकावर इतर स्थानकांच्या तुलनेत सुविधांची कमतरता दिसून येते.