फलाटांची अदलाबदल : होम प्लॅटफॉर्मला नागपूर मार्गाशी जोडण्याची कसरतगोंदिया : अनेक दिवसांपासून गोंदिया रेल्वे स्थानकाच्या होमप्लॅटफॉर्मला नागपूरकडे जाणाऱ्या मार्गाशी जोडण्याची मागणी आहे. मात्र गोंदियाच्या रेल्वे स्थानक व्यवस्थापनासाठी प्लॅटफॉर्म-१ ला त्या मार्गाशी जोडणे मोठेच त्रासदायक ठरणार आहे. आतापासूनच व्यवस्थापनाशी निगडित अधिकारी सदर बाबीला धरून चितींत दिसत आहे. परंतु त्यांना व्यवस्थापनाचे कौशल्य दाखवावेच लागेल. यापासून वाचण्याचा इतर मार्ग उपलब्ध नाही.सद्यस्थितीत महाराष्ट्र एक्सप्रेस व विदर्भ एक्सप्रेस या गाड्या प्लॅटफॉर्म-५ वरून सुटतात. सुटण्यापूर्वी सदर दोन्ही गाड्या या प्लॅटफॉर्मवर तासनतास उभ्या राहतात. प्रवाशांसाठी हे ठिकाण सुविधाजनक आहे. विशेष म्हणजे अनारक्षित प्रवर्गाचे प्रवासी काही तासांपूर्वीच पोहोचून आपल्यासाठी जागा पकडून ठेवतात. परंतु शहरातील नागरिकांनी सदर दोन्ही गाड्या होमप्लॅटफॉर्मवरून सोडण्यात याव्यात, अशी मागणी आधीच केलेली आहे. आता होम प्लॅटफॉर्मला नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गाशी जोडले जात आहे.अशावेळी जवळील भविष्यात ही मागणी पुन्हा उठेल, यात काही संशय नाही. याप्रकारामुळे रेल्वे गाड्यांच्या व्यवस्थापनाशी निगडीत अधिकारी चिंतीत दिसून येत आहेत. सदर दोन्ही गाड्यांच्या आगमणानंतर त्यांना होमप्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी मोठीच कसरत करावी लागेल, हे त्यांच्या समस्येचे मूळ कारण आहे. कशी सुटणार समस्या?होमप्लॅटफॉर्मजवळच प्लॅटफॉर्म-२ आहे. परंतु २ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी खूपच कमी आहे. या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवून प्लॅटफॉर्म-१ च्या बरोबर करावी लागेल. त्यामुळेच समस्येचे समाधान शक्य आहे. असे झाल्यास प्लॅटफॉर्म-२ वर प्लॅटफॉर्म-१ वरील काही गाड्या सहजतेने परिवर्तीत केल्या जाऊ शकतात. परंतु आतापर्यंत असा कोणताही प्रस्ताव रेल्वे विभागाला पाठविण्यात आला नाही. तरीसुद्धा हे सर्व सहजतेने केले जाऊ शकते, असे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
रेल्वे व्यवस्थापनाच्या समस्या वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2016 02:22 IST