गोंदिया : होळीच्या सणाला शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणून तिरोडा पोलिसांचे सातत्याने दारूच्या अड्ड्यावर धाडसत्र सुरू केले आहे. २६ मार्च रोजी बिरसी येथील राघोवलू नरेलला अण्णा याच्या घरी धाड टाकून १ लाख ३ हजार १९० रुपयाचा माल जप्त केला आहे. आरोपी राघोवलू रत्नेय्या नरेला यांनी दारू पिण्याच्या परवान्यावर आपल्या घरी दारूचा गुत्ता उघडल्याचे दिसून आले. त्याच्या घरी तीन ग्राहक दारू पिताना रंगेहात पकडले. त्याच्या घरझडतीत ऑफिसर चॉईस इंग्रजी दारू, बीअर बाटल्या, टेबल-खुर्ची, मोटरसायकलच्या डिक्कीत इंग्रजी दारूच्या बाटल्या असा एकूण १ लाख ३ हजार १९० रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. राघोवलू रत्नेय्या नरेला व तीन ग्राहकांवर तिरोडा पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनखाली योगेश पारधी, पोलीस उपनिरीक्षक केंद्रे, पोलीस हवालदार चेटुले, नायक पोलीस शिपाई वाडे, शेख, लांडगे, महिला नायक पोलीस शिपाई भूमेश्वरी तिरिले, महिला पोलीस शिपाई माधुरी शेंडे, चालक शेख यांनी केली आहे.
बिरसी येथील दारूच्या अड्ड्यावर धाड, लाखोचा माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:27 IST