शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी यंदाही रब्बीचा हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 22:02 IST

शेवटच्या पाण्याने साथ न दिल्यामुळे पिकांना वाचविण्यासाठी आताही सिंचन प्रकल्पातील पाणी सोडण्याची पाळी आली आहे. परिणामी प्रकल्पांतील पाणी साठ्यात सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे. अशात उन्हाळ््यातील पाण्याची गरज बघता यंदाही रब्बी हंगामासाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

ठळक मुद्देपाणीसाठ्यात सातत्याने घट : पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेवटच्या पाण्याने साथ न दिल्यामुळे पिकांना वाचविण्यासाठी आताही सिंचन प्रकल्पातील पाणी सोडण्याची पाळी आली आहे. परिणामी प्रकल्पांतील पाणी साठ्यात सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे. अशात उन्हाळ््यातील पाण्याची गरज बघता यंदाही रब्बी हंगामासाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणेच यंदाही रब्बी हंगाम संकटात आला आहे.मागील वर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी खरीपाचा हंगामही शेतकºयांच्या हातून गेला. तर प्रकल्पांत पाणी साठाच नसल्याने रब्बीसाठी पाणी देता आले नव्हते. एवढेच काय शहरातील पाण्याची टंचाई सोडविण्यासाठी कधी नव्हे ते पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. यंदा मात्र चांगला पाऊस बरसला.पावसामुळे जिल्ह्यात खरीपाचा हंगाम चांगला होईल अशी आशा शेतकºयांना होती. मात्र शेवटच्या एका पाण्यासाठी पीक तहानलेले असताना पावसाने दडी मारली. एका पाण्यासाठी पीक हातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. वातावरणातील बदलामुळे किड रोगांचा प्रादुर्भाव वाढला व पिकांची नुकसान झाले. मात्र पिकांना पाणी लागत असल्याने पाटबंधारे विभागाकडून आताही पाणी सोडले जात आहे.यामुळे मात्र प्रकल्पांतील पाणीसाठाही कमी होऊ लागला आहे. असेच सुरू राहील्यास जिल्ह्यातील उन्हाळा बघता त्यासाठीही पाणी राखून ठेवणे गरजेचे आहे. असे न केल्यास उन्हाळ््यात पुन्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार यात शंका नाही. परिणामी, प्रकल्पांतील पाणीसाठा वाचवून ठेवण्यासाठी रब्बीला हंगामासाठी पाणी देता येणार नाही. मागील वर्षीही प्रकल्पांत पाणी नसल्यामुळे रब्बीला पाणी दिले नव्हते. त्यामुळे आता रब्बी हंगामासाठी जिल्हा प्रशासन काय निर्णय घेतो त्यावर हे अवलंबून राहणार.भविष्यातील पाण्याची गरज बघता रब्बीचा हंगाम धोक्यात दिसून येत आहे.शहरासाठी पुजारीटोला धरणाचे पाणीमागील उन्हाळ््यात जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शहरात पाणी पेटले होते. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणक डून शहरात पाणी कपात सुरू करण्यात आली होती. यावर तोडगा म्हणून पुजारीटोला प्रकल्पातून शहरासाठी पाणी आणावे लागले होते. त्यावेळी पुजारीटोला प्रकल्पात काही प्रमाणात पाणीसाठा होता व त्यामुळेच शहराची तहान भागविता आली होती. त्यादृष्टीने यंदाही प्रकल्पात पाणी राखीव ठेवणे गरजेचे आहे. असे न झाल्यास शहराच्या पाणी समस्या काय रूप घेणार याची कल्पना न केलेलीच बरी

टॅग्स :water shortageपाणीटंचाई