शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी धानाची लागवड नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 22:32 IST

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत फारच कमी पाऊस झाल्याने उन्हाळ्यात जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाने काढले फर्मान : कमी पावसाचा फटका, शेतकºयांसमोर पेच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत फारच कमी पाऊस झाल्याने उन्हाळ्यात जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे पाणी बचतीच्या विविध उपाययोजना प्रशासनाकडून राबविल्या जात आहे. अत्यल्प पावसामुळे गेल्या वीस पंचवीस वर्षांत प्रथमच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात धानपिकांची लागवड करु नका, असे आवाहन शेतकºयांना करण्याची वेळ कृषी विभागावर आली आहे.गोंदिया जिल्ह्यातील धान हे प्रमुख पीक आहे. जिल्ह्यात सरासरी ११५० मि.मी.च्या वर पाऊस पडतो. त्यामुळे शेतकºयांना खरीप हंगाम आटोपल्यानंतर उन्हाळी धानपिकांची लागवड करणे शक्य होते. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि ५३४ मामा तलावांची सुध्दा शेतकऱ्यांना मदत होते. त्यामुळेच शेतकरी खरीपातील धानपिकांची कापणी झाल्यानंतर रब्बीची तयारी करतात. दरवर्षी जवळपास ७० हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड केली जाते. मात्र कमी पावसामुळे यंदा जिल्ह्यातील २० ते २२ हजार हेक्टरवरच रब्बी पिकांची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.आधीच धानाच्या लागवड क्षेत्रात घट झालेली आहे. त्यातच रब्बी हंगामात सिंचन प्रकल्पातील पाणी पिकांसाठी मिळणार नसल्याने धानपिकांची लागवड करु नका, असे फर्मान कृषी विभागाने काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे खरीपातील धानपिक वाया गेले. त्यामुळे रब्बी हंगामात धान पिकांची लागवड करुन त्यातून ही कसर भरुन काढण्याच्या विचारात शेतकरी होते. मात्र कृषी विभागाने रब्बी हंगामात धानपिक वगळून इतर कमी पाण्याच्या पिकांची लागवड करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे.मागील पंचवीस वर्षांत प्रथमच अशी स्थितीजिल्ह्यात कमी यावर्षी कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामात धानपिकांची लागवड करु नका. असे फर्मान काढण्याची वेळ कृषी विभागात मागील पंचविस वर्षांत प्रथमच आल्याची माहिती आहे. त्याला कृषी विभागाच्या अधिकाºयांनी आणि जिल्ह्यातील जाणकार शेतकऱ्यांनी दुजोरा दिला आहे. यावरुन यंदा जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.शहरवासीयांची पाण्याची भिस्त पुजारीटोलावरगोंदिया शहराला महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागातंर्गत डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेतून पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला. मात्र यंदा कमी पावसामुळे वैनगंगानदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात या योजनेतून अत्यल्प प्रमाणात पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. ही समस्या ओळखून सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठाजिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात १५ नोव्हेंबरपर्यंत २० ते २२ टक्के पाणीसाठा आहे. प्रकल्पातील एकूण पाण्यापैकी काही पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवावे लागते. उन्हाळा सुरू होण्यास पुन्हा चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणी उन्हाळी पिकांसाठी सोडले तर जिल्ह्यात पाणी टंचाईची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे संकट ओळखून कृषी विभागाने हे पाऊल उचलल्याचे बोलल्या जातकमी पावसामुळे यंदा जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. रब्बीतील धानपिकांना अधिक पाणी लागते. त्यामुळे पाण्याची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. धानपिक न घेता कमी पाण्याची हरभरा, लाखोळीसारखी पिके शेतकऱ्यांनी घ्यावी.- अनिल इंगळे,, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.कीडरोगांमुळे यंदा खरीपातील अर्धे उत्पन्न सुद्धा हाती येण्याची शक्यता नाही. त्यामुळे रब्बीत धानपिकाची लागवड करुन यातील कसर भरुन काढणार होतो. मात्र कृषी विभागाच्या फर्मानाने नवीनच संकट उभे ठाकले आहे.- रामेश्वर बसोने,सोनपुरी (शेतकरी)