शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल वाटपावरून सरपंच व सचिवांना धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 05:00 IST

२ ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून  येथील  नागरिक ग्रामसभेकरिता ग्रामपंचायत भवनात  मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. दरम्यान, सभेत घरकुलाचा मुद्दा निघताच एकच गदारोळ झाला. सुरुवातीला येथील क्रमांक ड च्या प्रतीक्षारत यादीत येथील एकूण ४५७ नागरिकांची नावे समाविष्ट होती. परंतु ही यादी प्रसिद्ध होताच त्यात केवळ ५७ कुटुंबांच्या नावे घरकुल मंजूर झाले व उर्वरित चारशे कुटुंबांना वगळण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : घरकुलच्या प्रतीक्षा ड  यादीमध्ये गावातील अनेक कुटुंबांची नावे समाविष्ट होती. परंतु ही यादी  प्रसिद्ध होताच यातील निम्मे नावे वगळण्यात आली. तेव्हा आमची नावे येथील सरपंच सचिवांनी वगळल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी वाद घातला. दरम्यान, यावरूनच सरपंच आणि सचिवाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार शनिवारी (दि.२) तालुुक्यातील चुलोद येथे घडला. दरम्यान वेळीच पोलिसांना पाचारण करण्यात आल्याने वाद मिटला. २ ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून  येथील  नागरिक ग्रामसभेकरिता ग्रामपंचायत भवनात  मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. दरम्यान, सभेत घरकुलाचा मुद्दा निघताच एकच गदारोळ झाला. सुरुवातीला येथील क्रमांक ड च्या प्रतीक्षारत यादीत येथील एकूण ४५७ नागरिकांची नावे समाविष्ट होती. परंतु ही यादी प्रसिद्ध होताच त्यात केवळ ५७ कुटुंबांच्या नावे घरकुल मंजूर झाले व उर्वरित चारशे कुटुंबांना वगळण्यात आले. सरपंच, सचिव व संगणक परिचालक यांनी  कटकारस्थान रचून नागरिकांची नावे वगळल्याचा आरोप येथील नागरिकांनी करीत उपस्थित ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. नागरिकांचा वाढता दबाव पाहता ग्रामपंचायत प्रशासनातर्फे पोलिसांना पाचारण करण्यात आले. तसेच यासंबंधाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा देण्यात आली.  पोलिसांनी त्वरित दखल घेत  परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनीसुद्धा प्रत्यक्षात येथे उपस्थित होऊन प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे तूर्तास गावकरी शांत झाले.

यादीतील ४०० नावे नेमकी वगळली कुणी?- येथील क्रमांक ड च्या प्रतीक्षारत यादीत येथील एकूण ४५७ नागरिकांची नावे समाविष्ट होती. परंतु ही यादी प्रसिद्ध होताच त्यात केवळ ५७ कुटुंबांच्या नावे घरकुल मंजूर झाले. त्यामुळे यादीतील ४०० लाभार्थ्यांची नावे नेमकी कुणी वगळली असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

घरकुलाचा सर्व्हे हा पंचायत समिती  स्तरावरून करण्यात आला. त्यामुळे यात ग्रामपंचायत प्रशासनाचा कोणताही हस्तक्षेप नाही. तरी ज्या नागरिकांची नावे वगळण्यात आली  त्यांच्यासाठी लवकरच विशेष ग्रामसभा घेऊन त्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.- कार्तिक चव्हाण, ग्रामविकास अधिकारीप्रतीक्षारत ड यादीतील सर्वच कुटुंबांना शासनाने घरकुलाचा लाभ द्यावा. जेणेकरून गावात शांतता व सलोखा निर्माण राहील. ग्रामीण विकास यंत्रणेने पुनर्विचार करून आपली चूक तत्काळ दुरुस्त करावी.- लतीश बिसेन, सरपंच ग्रामपंचायत चुलोद

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाsarpanchसरपंच