शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीत अनेक दिग्गजांना धक्का

By admin | Updated: July 29, 2015 01:19 IST

पिंडकेपार येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मदन पटले यांच्या पत्नी ...

सुकडी (डाकराम) : पिंडकेपार येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मदन पटले यांच्या पत्नी पुष्पा मदन पटले यांना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला. याशिवाय जि.प.च्या माजी सभापती संगीता दोनोडे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. तिरोडा तालुक्यातील सर्वात महत्वपूर्ण व सर्व तालुक्यातील नागरिकांच्या नजरा पिंडकेपार ग्राम पंचायत्ीाकडे लागल्या होत्या. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गोंदिया जि.प.चे माजी उपाध्यक्ष मदन पटले व तिरोडा पंचायत समितीचे माजी उपसभापती टुंडीलाल शरणागत यांनी जि.प. निवडणुकीदरम्यान भाजपात प्रवेश करुन पिंडकेपार ग्रामपंचायतवर भाजपा झेंडा आणणार हा संकल्प केला. उपसभापती टुंडीलाल शरणागत यांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करुन पुष्पा मदन पटले यांच्याविरोधात वॉर्ड क्र.१ मधून प्रतिमा तानशेन शेंडे यांना उभे केले. यामध्ये प्रतिमा शेंडे विजय झाल्या. त्याचप्रमाणे वॉर्ड १ मध्ये चंदन भिमसे व त्यांच्याविरोधात ताराचंद बेहरे उभे होते. भिमसे यांना पराभव पत्करावा लागला. वॉर्ड क्र.२ मधून माजी सरपंच गोपिका टेंभेकर यांच्या विरोधात नंदेश्वरबाई उभ्या होत्या. त्यामध्ये टेंभेकर विजयी झाल्या. वॉर्ड क्र. २ मधून महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लेखराम मेश्राम, भागवत कटरे व लखन शरणागत उभे होते. त्यामध्ये भागवत कटरे विजयी झाले. वॉर्ड नं. ३ मधून कार्यरत सरपंच शालीकराम भेलावे व गणेश बघेले हे निवडणूक रिंगणात होते. त्यामध्ये शालीकराम भेलावे विजयी झाले. वॉर्ड ३ मधून उपसरपंच वनमाला जांभुळकर, कल्पना शिंपी, रिंकी साखरे, कटरे बाई या रिंगणात होत्या. त्यामध्ये कल्पना शिंपी विजयी झाल्या. महत्वाची गोष्ट म्हणजे वॉर्ड क्र.२ मधून राहुन वॉर्ड क्र.३ मधून निवडणूक लढून जिंकणारे सरपंच शालीकराम भेलावे यांचा कार्यकाळ चांगल्या असल्याचे निष्पन्न झाले. बोदलकसा ग्रामपंचायतचे एकूण ३ वॉर्ड असून दोन वॉर्डची निवडणूक अविरोध झाली. फक्त वॉर्ड क्र.१ मध्येच निवडणूक घेण्यात आली. या वॉर्ड क्रमांक १ मध्ये चैतलाल चंदन पटले व त्यांच्याविरोधात सेवानिवृत्त ग्रामसेवक मेवालाल पटले उभे होते. हे दोन्ही चुलतभाऊ होते. यामध्ये चैतलाल पटले यांनी मेवालाल पटले यांचा १०४ मतांनी पराभव केला आहे. बोदलकसा वॉर्ड क्र.२ मधून भाऊलाल साखरे, नितू उईके, वॉर्ड क्रमांक ३ मध्ये अनु. जमातीची एक जागा रिक्त आहे. या जागेसाठी रामदास उईके यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला.