शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसात 85 हजार क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 05:00 IST

यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ९० हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. यात ४० हजार हेक्टरवर हलक्या धानाची लागवड करण्यात आली होती. हलके धान हे दिवाळीपूर्वी निघत असल्याने बरेच शेतकरी हलक्या धानाची लागवड करुन दिवाळीपूर्वी धानाची विक्री उधार उसणवारी फेडून सण साजरा करतात. मात्र यंदा हलका धान बाजारपेठ आल्यानंतरही धान खरेदी केंद्र सुरु झाले नव्हते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करण्याची वेळ आली.

ठळक मुद्दे६० धान खरेदी केंद्र सुरू : यंदा केंद्राची संख्या जाणार १३० वर

  लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : दिवाळीनंतर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. गेल्या आठ दिवसांच्या कालावधी मार्केटिंग फेडरेशनच्या ६० धान खरेदी केंद्रावरुन ८५ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे.यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ९० हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. यात ४० हजार हेक्टरवर हलक्या धानाची लागवड करण्यात आली होती. हलके धान हे दिवाळीपूर्वी निघत असल्याने बरेच शेतकरी हलक्या धानाची लागवड करुन दिवाळीपूर्वी धानाची विक्री उधार उसणवारी फेडून सण साजरा करतात. मात्र यंदा हलका धान बाजारपेठ आल्यानंतरही धान खरेदी केंद्र सुरु झाले नव्हते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करण्याची वेळ आली. मात्र आता दिवाळीनंतर जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाचे धान खरेदी केंद्र सुरु झाले आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे सध्या स्थितीत ६० धान खरेदी केंद्र सुरु झाले असून या केंद्रावर आतापर्यंत ८५ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाच खरेदीची प्रक्रिया जवळपास सहा महिने चालते मात्र यंदा ही प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले. धान खरेदीतील अडचणी दूर शेतकऱ्यांना त्रासाविना धानाची विक्री करता यावी यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी नुकतीच मुंबई मंत्रालयात या विषयावर बैठक घेतली. धान खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले आहे. त्यानंतर आता जिल्हा मार्केटिंग फेडरेशन सुध्दा धान खरेदी केंद्र वाढविण्याच्या कामी लागला आहे. 

धान खरेदी केंद्राची संख्या होणार १३० वर दरवर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत एकूण ७० धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदी केली जाते. मात्र यंदा धान खरेदी केंद्राची संख्या वाढविण्यात येणार आहे. जवळपास १३० धान खरेदी सुरु होण्याची शक्यता आहे. धान खरेदी केंद्र मिळण्यासाठी आतापर्यंत १२९ सहकारी संस्थांनी अर्ज केले असून यापैकी २३ सहकारी संस्थांची अर्ज परिपूर्ण असल्याने या संस्थांना धान खरेदीची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समित्यांना संजीवनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या केवळ आता नावापुरत्याच शिल्लक राहिल्या आहे. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समित्यांना संजीवनी देण्यासाठी त्यांना सुध्दा हमीभावानुसार धान खरेदी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. लवकरच या संदर्भात पणन विभागाकडून आदेश निघणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड