शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 22:39 IST

यंदा सुरूवातीला पावसाने चांगलीच साथ दिल्याने जिल्ह्यात भरघोस धान पीक झाले आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख ६० हजार २२९ क्विंटल धान खरेदी झाली आहे. यात मार्केटींग फेडरेशनने १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे.

ठळक मुद्देमार्केटिंग फेडरेशनची १० लाख क्विंटल: धान खरेदीत आणखी भर पडणार

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा सुरूवातीला पावसाने चांगलीच साथ दिल्याने जिल्ह्यात भरघोस धान पीक झाले आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख ६० हजार २२९ क्विंटल धान खरेदी झाली आहे. यात मार्केटींग फेडरेशनने १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे. तर आदिवासी विकास महामंडळाने ६ लाख २ हजार ९३३ क्विंटल धान खरेदी केली आहे.जिल्ह्याची ‘धानाचे कोठार’ अशी ख्याती आहे. कारण जिल्हयात धान पीक हेच प्रमुख पीक म्हणून घेतले जाते. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी धानाचीच शेती करीत असून सर्वाधीक धानाचेच उत्पादन जिल्ह्यात होते. मात्र आजही बहुतांश शेतकरी वरथेंबी पाण्यावर आपली शेती फुलवित आहे. यामुळे निसर्गाच्या मर्जीवरच जिल्ह्यातील शेती फुलत असल्याची येथील वास्तवीकता आहे. हेच कारण आहे की, मागील काही वर्षांपासन पावसाच्या लहरीपणामुळे धानाचे उत्पादन झाले नाही व शेतकरी अडचणीत आला होता.यंदा मात्र सुरूवातीला पावसाने चांगली साथ दिली व शेतकरी धान पीक घेवू शकला. पाहिजे त्या प्रमाणात पाऊस मिळाल्यामुळे जिल्ह्यात यंदा भरभरून धानाचे उत्पादन झाल्याचे दिसून येत आहे.हेच कारण आहे की, जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख ६० हजार २२९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.यात मार्के टींग फेडरेशनने १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे. तर आदिवासी विकास महामंडळाने ६ लाख २ हजार ९३३ क्विंटल धान खरेदी केली आहे.मार्च पर्यंत होणार धान खरेदीजिल्ह्यात मार्केटींग फेडरेशन ५७ केंद्रांच्या माध्यमातून तर आदिवासी विकास महामंडळ ४३ केद्रांच्या माध्यमातून धान खरेदी करते. अशात आतापर्यंत दोघांनी मिळून १६ लाख ६० हजार २२९ क्विंटल धान खरेदी केली आहे. मात्र मार्च अखेरपर्यंत धान खरेदी केली जाणार असल्याने धान खरेदीची ही आकडेवारी आणखीही वाढणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा मागील वर्षांच्या तुलनेत भक्कम धान खरेदी होणार असल्याचे दिसत आहे.भाव वाढीच्या आशेने विक्री थांबलीशेजारच्या मध्यप्रदेश राज्यात कॉँग्रेस सरकार सत्तेत येताच त्यांनी धानाला २५०० हजार रूपये हमीभाव जाहीर केला आहे. त्यापाठोपाठ आपल्या राज्यातील विरोधी पक्षातील नेतेही धानाला २५०० रूपये भाव द्यावा ही मागणी रेटून धरत आहे. अशात राज्यातही धानाला २५०० भाव जाहीर झाल्यास आताच विक्री करून नुकसानीत जाण्यापेक्षा शेतकऱ्यांनी धान विक्री थांबविल्याचे बोलले जात आहे. मात्र मार्च पर्यंत केंद्र सुरू राहणार असल्याने नक्कीच धान खरेदीत भर पडणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Marketबाजार