शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न लावणाऱ्या ४१ जणांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:00 IST

लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.याच अंतर्गत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, ट्राकिंग फोर्स, नेहरू चौक, हनुमान मंदिर सिव्हील लाईन, मामा चौक येथे बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी २१ एप्रिल रोजी सकाळी ७.४० ते ८.३० वाजताच्या दरम्यान मास्क न लावता रस्त्यावर फिरणाऱ्या ४१ लोकांवर दंडात्मक कारवाई केली.

ठळक मुद्देशहर पोलिसांची मोहीम : नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना धडा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशात आणि राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. याला प्रतिबंध लावण्यासाठी शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणे अनिवार्य केले आहे. मात्र यानंतर अनेकजण विनाकारण घराबाहेर पडून नियमांचे उल्लघंन करीत असून मास्कचा वापर करीत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी आता मास्क न लावणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी (दि.२१) शहरातील विविध भागात पोलिसांनी मास्क न लावणाºया ४१ जणांवर दंडात्मक कारवाई केली.लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.याच अंतर्गत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, ट्राकिंग फोर्स, नेहरू चौक, हनुमान मंदिर सिव्हील लाईन, मामा चौक येथे बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी २१ एप्रिल रोजी सकाळी ७.४० ते ८.३० वाजताच्या दरम्यान मास्क न लावता रस्त्यावर फिरणाऱ्या ४१ लोकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्यावर एकूण १३ हजार ४०० रूपये दंड आकारण्यात आला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, पोलीस हवालदार तिडके, चंदेल, पोलीस नायक अंबरवाडे, पोलीस शिपाई कापसे, कोटांगले, उराडे, पोलीस हवालदार कांबळे, कृणाल रामटेके, महसूल विभागाचे कर्मचारी राठोड, टेंभरे यांनी ही कारवाई केली. शहर पोलिसांनी मागील तीन चार दिवसांपासून शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर आणि मास्कचा वापर न करणाºयांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. मागील चार दिवसांत शंभरहून अधिक जणांवर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.मास्क न लावता दुचाकीवर तिघेजणतिरोडा तालुक्याच्या काचेवानी येथे २१ एप्रिलच्या सायंकाळी ५.१५ वाजता एमएच ३५ एएल ४५२३ च्या चालकाने तोंडाला मास्क न लावता विनाकारण तिरोडाच्या संत रविदास वॉर्डातून फिरत असताना त्या मोटारसायकलवरील तिघांवर भादंविच्या कलम २६९, १८८, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस