शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

‘त्या’ नराधमाला फाशीची शिक्षा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:23 IST

येथील एका सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि.१) घडली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी सोमवारी (दि.३) सर्वपक्षीय देवरी बंदचे आवाहन करण्यात आले. यानंतर सकाळी ९ वाजता स्थानिक पंचशिल चौकातून उपविभागीय कार्यालर्यावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सर्व देवरी शहरवासीय सहभागी झाले होते. बालीकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

ठळक मुद्देनागरिकांचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा : घटनेचा तीव्र निषेध, बाजारपेठ कडकडीत बंद, सर्व राजकीय पक्षांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : येथील एका सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि.१) घडली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी सोमवारी (दि.३) सर्वपक्षीय देवरी बंदचे आवाहन करण्यात आले. यानंतर सकाळी ९ वाजता स्थानिक पंचशिल चौकातून उपविभागीय कार्यालर्यावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सर्व देवरी शहरवासीय सहभागी झाले होते. बालीकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.सोमवारी स्थानिक पंचशिल चौकातून देवरी तालुकावासीयांच्यावतीने जनआक्रोश मोर्चा सकाळी ९ वाजता काढण्यात आला. या मोर्चात सहभागी होण्यासाठी स्वयंस्फूर्तपणे सकाळी ७ वाजतापासूनच महिला, पुरुष, आबाल वृद्ध पंचशिल चौकात गोळा व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर मोर्चाला सुरुवात होऊन पंचशिल चौक ते मसकºया चौक,बौद्ध विहार चौक,पोलीस ठाणे, कारगील चौक, दुर्गा चौक, बाजार लाईन, राणी दुर्गावती चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चामध्ये नागरिक सहभागी होऊ लागले त्यामुळे या मोर्चाला विराट स्वरुप प्राप्त झाले. यादरम्यान मोर्चेकºयांच्यावतीने आरोपी अश्विन मेश्राम याला फाशी शिक्षा झालीच पाहिजे, अल्पवयीन बालिकेला न्याय मिळालाच पाहिजे, सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे. अबला नारी की एक ही पुकार बंद करो ये अत्याचार अशी नारेबाजी करीत हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर पोहचला. येथे विविध मान्यवरांनी घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. तसेच आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. या वेळी आमदार संजय पुराम, नगराध्यक्ष कौसल कुंभरे, कॉंग्रेस नेते सहषराम कोरोटे, महेश जैन, रमेश ताराम, संतोष तिवारी, प्रमोद संगीडवार, यादोराव पंचमवार, अ‍ॅड. प्रशांत संगीडवार, अ‍ॅड. भुषण मस्करे, डॉ. गुरु कापगते, डॉ. अनिल चौरागडे, अन्नू आफताफ शेख, विनोद अग्रवाल, राजू अग्रवाल, ओमप्रकाश रामटेके, गणेश बिंझलेकर, संतोष तुरकर, विजय मते, प्रविण दहिकर, रतिराम दरवडे, राजू गुप्ता, अ‍ॅड. गंगभोईर, दिलीप राऊत, गोपाल तिवारी, वैभव जैन, नरेश जैन, छोटू भाटीया, शेख कनोजिया, कमलेश पालीवाल, सविता पुराम, जायस्वाल, उषा शहारे, बाली राऊत, माया निर्वाण, भुमिता बागडे, देवकी मरई, समता सैनिक दलाच्या महिला कार्यकर्त्या, मुस्लीम महिला कार्यकर्त्या यांचा समावेश होता. या वेळी परिसरातील नागरिक हजारोंच्या संख्येत उपस्थित होते. जनसमुदायाच्या मार्गदर्शनानंतर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी तहसीलदार विजय बोरुडे यांनी स्विकारले. मोर्चेकऱ्यांच्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन उपस्थित जनसमुदायाला दिले. यादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणेदार कमलेश बच्छाव यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.