लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना पाणी पुरवठा विभागाचे पंप हाऊस नाहक भुर्दंड देणारे ठरत आहेत. यातून पुरवठा करण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे यावर महिन्याकाठी केला जाणार खर्च व्यर्थ ठरत आहे. नगर परिषदेला पंप हाऊसच्या वीज देयकापोटी ५० हजार रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.नगर परिषदेचे शहरात ५६ पंप हाऊस आहेत. बोअरवेलच्या माध्यमातून या पंपहाऊसमधील टाकीत पाणी साठवून त्यानंतर त्याचा पुरवठा केला जातो. मात्र हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिक त्याचा अन्य कामांसाठी वापर करतात. नगर परिषदेकडून पाणी पुरवठा न झाल्यास काहीच फरक पडणार नाही, असे दिसते.या पंपहाऊसमधील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी होत नसून शहरवासीय महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाकडून होणारे पाणी पितात. त्यामुळे नगर परिषद या पंप हाऊसवर करीत असलेला खर्च व्यर्थ जात असल्याचे चित्र आहे. नगर परिषद पाणी पुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पंपहाऊसचे दरमहा सुमारे ५० हजार रूपयांचे वीज बिल येते. यात मागील महिन्यात ४६ हजार ३०२ रूपयांचे बिल आल्याची माहिती आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुरेपूर पाणी पुरवठा केला जात आहे. मग नगर परिषद या पंप हाऊसवर महिन्याकाठी हजारो रुपयांचा खर्च कशासाठी करीत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.स्टँड पोस्टचे ८ लाखांचे बिल थकीतनगर परिषदेचे सध्या ४६ स्टँड पोस्ट चालविले जात आहेत. या स्टँड पोस्टच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत आहे. यासाठी नगर परिषदेला दरमहा सुमारे १ कोटी २५ लाखांचे बिल भरावे लागते. मध्यंतरी नगर परिषद व मजिप्रा अधिकाºयांत या स्टँड पोस्टला घेऊन वाद सुरू होता. मजिप्रा ५२ स्टँड पोस्ट असल्याचे सांगत असताना नगर परिषद ३२ स्टँड पोस्ट सुरू असल्याचे सांगते. दोन्ही विभागांच्या अधिकाºयांनी मिळून पाहणी केली असता ४२ स्टँड पोस्ट सुरू असल्याचे आढळले. यात १० स्टँड पोस्ट नगरसेवकांनी आपल्या परिसरात सुरू केले असल्याची बाब पुढे आली. मात्र यापासून न.प.पाणी पुरवठा विभागाच अनभिज्ञ होता. तर स्टँड पोस्टचे ८ लाख रुपयांचे देयक थकीत आहे.
पंप हाऊसचा न.प.ला भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 20:58 IST
नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना पाणी पुरवठा विभागाचे पंप हाऊस नाहक भुर्दंड देणारे ठरत आहेत. यातून पुरवठा करण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे यावर महिन्याकाठी केला जाणार खर्च व्यर्थ ठरत आहे.
पंप हाऊसचा न.प.ला भुर्दंड
ठळक मुद्दे पाणी पुरवठा विभाग अनभिज्ञ : दरमहा ५० हजारांचे वीज बिल