शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

‘महामानवाला अभिवादन’ विशेषांकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 21:17 IST

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमीत्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने काढलेल्या ‘महामानवाला अभिवादन’ या लोकराज्यचा एप्रिल महिन्याच्या विशेषांकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या हस्ते रविवारी (दि.८) सामाजिक न्याय भवनातील सभागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्र मात करण्यात आले.

ठळक मुद्देसामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन : डॉ.आंबेडकरांच्या जीवनावर प्रकाश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमीत्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने काढलेल्या ‘महामानवाला अभिवादन’ या लोकराज्यचा एप्रिल महिन्याच्या विशेषांकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या हस्ते रविवारी (दि.८) सामाजिक न्याय भवनातील सभागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्र मात करण्यात आले.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार, प्रा.धर्मशील चव्हाण, बार्टीचे सहायक प्रकल्प संचालक (समतादूत) रिदय गोडबोले प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी काळे यांनी, डॉ.आंबेडकर हे जागतिक किर्तीचे विचारवंत होते. त्यांनी समाजातील शोषित, पिडीत ववंचित घटकांच्या कल्याणासाठी कार्य केले. लोकराज्यचा महामानवाला अभिवादन’ या विशेषांकामध्ये अत्यंत चांगले लेख असल्याचे त्यांनी सांगितले.या विशेषांकात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी अतिथी संपादकीयमध्ये असामान्य व अद्वितीय असे वर्णन डॉ.आंबेडकरांचे केले आहे. ‘सामाजिक परिवर्तनाला दिली नवी दिशा’ यामधून नामदार बडोले यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ‘हक्क, अधिकार आणि दिले आत्मभान’ या लेखामधून नामदार बडोले यांनीडॉ.आंबेडकरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सर्वांना समान न्याय, इतिहास तज्ञ डॉ.जयसिंगराव पवार यांचा राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.आंबेडकर यावर लेख,याशिवाय परिवर्तनाचे अग्रदूत, जलनीतीचे उदगाते, ऊर्जाशक्तीला चालना, उत्कृष्ट संसदपटू आणि शिस्तिप्रय प्रशासक, बाबासाहेबांची जयंती आणि कोणी सुरु केली, महामानवाचा स्मृतीगंध, ग्रंथकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, बुध्दीवादाची प्रेरक शक्ती, शिक्षणाची मुहूर्तमेढ, शांततामय सहजीवनाचे हमीपत्र, महामानवाचा जीवनपट, समतेचा उदगाता, प्रेरणा, ऊर्जा आणि स्फूर्ती देणारे तीर्थस्थळे, सुरक्षेचा प्रहरी, नव्या संधी प्रगतीच्या, दलित साहित्याचा आधारवड या विविध विषयांमधून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावर लेखकांनी प्रकाश टाकला आहे.याशिवाय अर्थसंकल्प विशेष, शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य, रोजगार निर्मिती व उद्योजक चालना, तसेच अन्य विषयांवर सुद्धा लेखन या विशेषांकात करण्यात आले आहे.या विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, समाज कल्याण विभागाच्या वसतिगृह व निवासी शाळेचे विद्यार्थी, बार्टीचे समतादूत, समाज कल्याण विभाग, विविध महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.