शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या खोट्या गप्पा मारणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:35 IST

आमचे सरकार सत्तेवर आल्यास गोंदिया-भंडारा जिल्ह्यात विकास कामे करु,असे आश्वासन केंद्र व राज्यातील सत्तारुढ सरकारने दिले होते. मात्र मागील चार वर्षांत या दोन्ही जिल्ह्यात एकही ठोस सांगण्यासारखे विकास काम झाले नाही. लोकांना केवळ अच्छे दिन स्वप्ने दाखवून त्यांची दिशाभूल करण्याचे काम केले.

ठळक मुद्देराजेंद्र जैन : कोचेवाही, बनाथर, वडेगाव येथे प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमचे सरकार सत्तेवर आल्यास गोंदिया-भंडारा जिल्ह्यात विकास कामे करु,असे आश्वासन केंद्र व राज्यातील सत्तारुढ सरकारने दिले होते. मात्र मागील चार वर्षांत या दोन्ही जिल्ह्यात एकही ठोस सांगण्यासारखे विकास काम झाले नाही. लोकांना केवळ अच्छे दिन स्वप्ने दाखवून त्यांची दिशाभूल करण्याचे काम केले. त्यामुळे विकासाच्या नावावर खोट्या गप्पा मारणाऱ्यांना जनताच नक्कीच धडा शिकवेल असे प्रतिपादन आ. राजेंद्र जैन यांनी येथे केले.भंडारा- गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि. पा. पिरिपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ गोंदिया तालुक्यातील कोचेवाही, बनाथर, वडेगाव येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी ओमप्रकाश भक्तवर्ती, सुखदेव गुप्ता, प्रेमलाल टेंभरे, चैतराम पटले, तेजलाल पटले, रेखलाल राऊत, सतीश बिसेन, अंकित बिसेन, माधोसिंह परिहार, हरसिंग जतपेले, देवेंद्र बागडे, तोपसिंग बुदले, प्रदीपसिंह चव्हाण, राजेश माने, अशोक बर्वे, धनंजय गुप्ता, मेहतरलाल तेलसे, गणेश मरठे, सिताराम नेवारे, दिनेश मरठे, प्रेमलाल दिवेवार, साहेबलाल खरे, हरूलाल अडमे, दीपक बर्वे, किसन खरे, धनराज हिरवाने, पवन तेलसे, मुलचंद तेलसे, अशोक नेवारे, भारत लांजेवार, प्रणय सोनी, हनस बर्वे, गजेंद्र शेंद्र, रुपलाल पाचे, छेदीलाल पाचे, हेमराज देशकर उपस्थित होते. जैन म्हणाले, सत्तारुढ सरकारने कर्जमाफीची घोषणा केली मात्र अद्यापही या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. महागाईच्या दरात वाढ झाली आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या असून सरकार सर्वच गोष्टीत फेल झाले आहे. त्यामुळे अशा सरकारला धडा शिकविण्यासाठी कुकडे यांना साथ देण्याचे आवाहन केले.

टॅग्स :congressकाँग्रेस