शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

आरोग्य अधिकाऱ्याचे अश्लील चाळे

By admin | Updated: September 9, 2016 02:05 IST

तालुक्यातील रुग्णांना रुग्णसेवा तत्परतेने मिळावे यासाठी शासनाकडून योजनांचा पिटारा रुग्णालयांना देण्यात येत आहे.

बनगाव आरोग्य केंद्रातील प्रकार : कर्मचाऱ्यांची डीएचओकडे तक्रारआमगाव : तालुक्यातील रुग्णांना रुग्णसेवा तत्परतेने मिळावे यासाठी शासनाकडून योजनांचा पिटारा रुग्णालयांना देण्यात येत आहे. परंतु या योजनांना सार्थक करण्यासाठी असलेली यंत्रणा कुचकामी ठरत आहे. अधिकारी स्वत:चे कर्तव्याचे पालन करण्याऐवजी बनगाव आरोग्य केंद्रात अश्लील चाळे करतात, अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना केली आहे. ग्रामीण नागरिकांना तत्काळ रुग्णसेवा मिळावी यासाठी आमगाव येथील बनगाव प्राथमिक उपचार केंद्र शासनाने सुरू केले. रुग्णेसेवेसाठी तत्पर असलेले रुग्णालय सध्या नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे वादग्रस्त ठरले आहे.आमगाव येथे अस्थाई स्वरुपात असलेले बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी गगन गुप्ता यांनी कार्यभार सांभाळला आहे. त्यांच्या कार्यवृत्तीला जेमतेम रुग्णसेवेला हात लागल्याने आपली वर्तवणुकीत बदल घडवित मर्जीतील अधिपरिचारिका यांना सोबती करुन अन्य कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शिस्तपालनाची जबाबदारी न घेता स्वत:चा रुबाब दाखवित खास अधिपरिचारिका यांना हमखास आश्रम देत आरोग्य केंद्रातील रुग्णसेवेला वेशीला टांगले. रुग्णसेवा देण्याऐवजी गुप्ता यांनी आपल्या मर्जीतील अधिपरिचारिकांना स्वत:च्या कक्षात बोलावून असभ्य वर्तवणूक करीत असल्याचे गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केले. यासंदर्भात वरिष्ठांना तक्रार करण्यात आली आहे. रुग्णालयात कायद्यातील तरतूदीनुसार असलेली वैद्यकीय गर्भपात करण्यासाठी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांच्या ऐवजी अधि परिचारिकाकडून गर्भपात करण्याची कामे केली जातात. याच गर्भपातासाठी रुग्णांकडून दोन हजार ते तीन हजार रुपये घेण्यात येतात. डॉ. गगन गुप्ता यावेळी आपले कर्तव्य बजावण्याऐवजी ग्रामीण रुग्णालयात आराम करतात. त्यामुळे रुग्णसेवा सलाईनवर आहे.वैद्यकीय अधिकारी गगन गुप्ता यांच्या असभ्य वर्तवणुकीने रुग्णसेवा खंडीत झाली आहे. कर्मचाऱ्यांसोबत द्वेषपूर्ण वागणुकीने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. डॉ. गुप्ता यांच्या अशोभनीय कृत्याची लेखी तक्रार कर्मचाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्रातील कारभार चव्हाट्यावर आला आहे. डॉ. गुप्ता, परिचारिका सी.आर. सूर्यवंशी, एल.पी. चन्ने, वाहन चालक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)डॉ.गुप्ता यांच्यावर गंभीर आरोपबनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी गगन गुप्ता यांच्यावर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना लेखी गंभीर आरोप केले आहेत. डॉ. गुप्ता स्वत:च्या कक्षात अधिपरिचारिका यांच्यासोबत अश्लील चाळे करतात. रुग्णालयातील कर्तव्य सोडून ग्रामीण रुग्णालयात आश्रय घेतात. नमुने तपासनी करीता वाहन उपलब्ध करीत नाहीत. रुग्णांना अ‍ॅम्बुलेन्स सेवा देत नाहीत, वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी ५०० ते ३००० रुपये घेतात असे अनेक गंभीर आरोप लेखी निवेदनात केले आहे. परंतु वरिष्ठांच्या आश्रयामुळे या आरोपांची चौकशी होणार किंवा नाही अशी शंका अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना येते.अधिपरिचारिका गायधने यांच्या आत्महत्येत हलगर्जीपणायाच आरोग्य केंद्रातील कंत्राटी अधिपरिचारिका आर.एम. गायधने यांनी १२ आॅगस्टला आत्महत्या केली. या आत्महत्ये प्रकरणी डॉ. गुप्तां यांनी हलगर्जी केली आहे. त्यांनी आरोग्य केंद्रातील अनैतिक संबंधांना चालना दिली. त्यामुळेच अधिपरिचारिका गायधने यांनी आत्महत्या केल्याची बाब कर्मचाऱ्यांनी तक्रारीत नमुद केली आहे.