शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
4
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
5
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
6
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
7
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
8
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
9
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
10
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
11
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
12
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
13
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
14
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
15
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
16
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
17
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
18
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
19
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
20
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान

गावातील पथदिव्यांचे थकीत वीजबिल भरण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2022 05:00 IST

तालुक्यातील वीज वितरण कंपनीने थकीत बिलाचा भरणा करण्यासाठी वीज तोडो अभियान सुरू केले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतअंतर्गत सुरू असलेल्या गावातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा एकाएकी विद्युत विभागाने कायमचा बंद केला. गावात वीज पुरवठा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेने तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांना देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी :  वीज वितरण कंपनीने कोणतीही सूचना न देता अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतच्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा कायमचा बंद केला. विद्युत विभागाच्या कारवाईने तालुक्यातील गावात सर्वत्र काळोखाची छाया पसरली आहे. ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी गावातील पथदिवे प्रकाशमय करणे अत्यंत गरजेचे आहे.पथदिव्याचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी थकीत वीजबिलाचा भरणा करणे अपरिहार्य झाले आहे. जिल्हा परिषदेने तत्काळ प्रभावाने निधीची उपलब्धता करून द्यावी, या मागणीचे निवेदन तालुका सरपंच सेवा संघाच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांना देण्यात आले. तालुक्यातील वीज वितरण कंपनीने थकीत बिलाचा भरणा करण्यासाठी वीज तोडो अभियान सुरू केले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतअंतर्गत सुरू असलेल्या गावातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा एकाएकी विद्युत विभागाने कायमचा बंद केला. संपूर्ण तालुक्यात गावगाडा अंधाराच्या गडद छायेत पसरला आहे. हा तालुका आदिवासीबहुल असून, व्याघ्र प्रकल्प व नक्षलग्रस्त आहे. गावाजवळ जंगलव्याप्त परिसर असल्याने जंगली जनावरांची गावात भटकंती असते. केव्हाही अनुसूचित प्रकार घडू शकतात. गावात वीज पुरवठा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेने तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांना देण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. एल. पुराम, गटविकास अधिकारी विलास निमजे उपस्थित होते. शिष्टमंडळात तालुका सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष भोजराम लोगडे, सरचिटणीस अशोक कापगते, डॉ. अजय अंबादे, लक्ष्मीकांत नाकाडे, विश्वनाथ बाळबुद्धे, प्रतिमा बोरकर, सुनीता ब्राह्मणकर यांचा समावेश होता. 

१ कोटी ९ लाखांचा निधी मंजूर - वीजबिलाचा भरणा करण्यासाठी निधीची तरतूद तालुका सरपंच सेवा संघाचे एक शिष्टमंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांना निमगाव ग्रामपंचायत कार्यालयात भेटले. संघटनेच्या वतीने त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील पथदिव्यांच्या थकीत वीजबिलाचा भरणा करण्यासाठी १ कोटी ९ लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :electricityवीजzpजिल्हा परिषद