शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:00 IST

महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस जिल्ह्यातील २८ हजार ६५५ शेतकरी पात्र ठरले होते. मात्र यापैकी आत्तापर्यंत यापैकी केवळ २२ हजार ५४८ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. कर्जमाफीच्या रक्कमेपोटी त्यांच्या बँक खात्यावर ९० कोटी ४१ लाख रुपये जमा करण्यात आले आहे. तर अद्याप ५ हजार ३६७ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळायचा आहे.

ठळक मुद्देशासनाचे आदेश धडकले : सर्व बँकांना काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. परिणामी या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जाची उचल करण्याची अडचण जात होती. हीच बाब ओळखून शासनाने सर्व जिल्हा आणि व्यापारी बँकाना कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे निर्देश दिले आहे. यासंबंधिचे निर्देश शासनाने सर्व व्यापारी, ग्रामीण आणि जिल्हा बँकाना दिले आहे. तसे आदेश सुध्दा सर्व बँकामध्ये धडकले आहे.महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस जिल्ह्यातील २८ हजार ६५५ शेतकरी पात्र ठरले होते. मात्र यापैकी आत्तापर्यंत यापैकी केवळ २२ हजार ५४८ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. कर्जमाफीच्या रक्कमेपोटी त्यांच्या बँक खात्यावर ९० कोटी ४१ लाख रुपये जमा करण्यात आले आहे. तर अद्याप ५ हजार ३६७ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळायचा आहे. हे सर्व शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले असून त्यांच्या खात्यावर अद्याप कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली नाही.त्यामुळे या शेतकऱ्यांचे पीक कर्ज खाते निरंक न झाल्याने त्यांना यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्जाची उचल करण्याची अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम देखील अडचणीत आला होता. शेतकऱ्यांची ओरड वाढली होती. तर मागील तीन महिन्यापासून राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊन होते.त्यामुळे शासनाच्या महसुली उत्पन्नात घट झाली आहे. परिणामी शासनाने विविध खर्चाला कात्री लावली आहे. तसेच विविध शासकीय विभागांना सुध्दा खर्चात कपात करण्याचे निर्देश दिले आहे. सरकारकडे सध्या निधीचा अभाव असल्याने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा करण्यास अडचण निर्माण झाली आहे.त्यामुळे शासनाने यावर तोडगा काढत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम शासनाकडून येणे असल्याचे दाखवून त्यांना नवीन पीक कर्जाचे वाटप करण्याचे निर्देश दिले आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेला एकही शेतकरी पीक कर्ज मिळण्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व जिल्हा, ग्रामीण आणि व्यापारी बँकाना दिले आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सुध्दा जिल्ह्यातील सर्व बँकांना या संबंधिचे निर्देश दिले आहे.शासन देणार बँकांना व्याजाची रक्कममहात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होणे बाकी आहे. मात्र यामुळे शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने ही कर्जमाफीची रक्कम शासनाकडून येणे असल्याचे दाखवून नवीन पीक कर्ज देण्याचे निर्देश दिले आहे. तसेच जोपर्यंत ही रक्कम शासनाकडून बँकाना प्राप्त होत नाही, तोपर्यंत या रक्कमेवरील व्याज शासन देणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज