शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणकर्ते व प्रशासनच जबाबदार

By admin | Updated: May 28, 2016 01:52 IST

महालगाव येथील प्रकरण चिघळवण्यात उपोषणकर्ते जबाबदार आहेत. ते आमरण उपोषणाला बसले.

गावकऱ्यांचा आरोप : महालगाव प्रकरणअर्जुनी-मोरगाव : महालगाव येथील प्रकरण चिघळवण्यात उपोषणकर्ते जबाबदार आहेत. ते आमरण उपोषणाला बसले. ५४ दिवस पूर्ण झालेत. मात्र वैद्यकीय तपासणी अहवालात त्यांच्या प्रकृतीत बदल नाही. हे कसले उपोषण? याला तहसील व पोलीस प्रशासन एकप्रकारे गुप्तपणे सहकारी करीत असून प्रकरण चिघळवण्यात उपोषणकर्ते व प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप पत्रपरिषदेत तेथील काही गावकऱ्यांनी केला. सोबतच हे प्रकरण कुठेतरी संपविण्यासाठी सहकार्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.महालगाव येथील गट क्र. १७९ मध्ये ०.१० हे.आर. जागा ही १९९६-९७ च्या अतिक्रमण पंजीत बौद्धांचा झेंडा अशी नोंद आहे. येथे नियमितपणे बौद्ध धर्मियांचे सार्वजनिक कार्यक्रम होतात. २००७ मध्ये दलित वस्ती योजनेंतर्गत समाजभवनाचे बांधकाम झाले. समाज भवनाच्या समानांतर चार सिमेंटचे कॉलम उभे करुन बौद्ध बांधवांनी वर्गणी गोळा करुन एका खोलीचे बांधकाम केले व याठिकाणी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. लगेच दुसऱ्या दिवशी गावातील अनुसूचित जमातीच्या लोकांनी विरोध दर्शविला. तेव्हापासूनच दोन जातीत हा वाद सुरू झाला. १४ एप्रिल रोजी डॉ.आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली. कलम १४४ लागू करुन कार्यक्रम पार पडला. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने पुन्हा परवानगी मागण्यात आली. प्रशासनाने परवानगी दिली. बंदोबस्तासाठी ५० ते ६० पोलीस तैनात करण्यात आले. बौद्ध समाजबांधव कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. मात्र अनु. जमातीच्या लोकांनी लाठ्या-काठ्या घेऊन ध्वजाभोवती घेराव केला. ज्याप्रकारे आंबेडकर जयंतीला कलम १४४ लागू होती ती कलम बौद्ध पौर्णिमेगच्या दिवशी असती तर हा प्रकार घडलाच नसता. याचा अर्थ प्रशासन त्या लोकांना सहकार्य करीत असल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला. महालगावच्या दर्शनी भागात असलेल्या प्रवेशद्वारावर चार ते पाच महापुरुषांची चित्रे आहेत. यापैकी डॉ. आंबेडकर यांच्या चित्रावर शेण फेकण्यात आले. बौद्ध बांधव प्रवेशद्वाराजवळ एकत्र आले तेव्हा अनु. जमातीची लोकं धावून आली. महिलांना खाली पाडून मारहाण करण्यात आली. जिवे मारणे व खैरलांजीसारखे प्रकरण घडवून आणण्याची धमकी दिली. मारहाणीत ४ महिला व एका पुरुषाला दुखापत झाली. त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणात तहसीलदार, पोलीस अधिकारी व अनु. जमातीची लोकं सुनियोजित पद्धतीने अल्पसंख्याक असलेल्या बौद्ध समाजावर अन्याय, अत्याचार करीत आहेत असा आरोप त्यांनी केला. सत्यभामा रंगारी या महिलेच्या घरात घसून अनु. जमातीच्या लोकांनी मारहाण केली. गावातील प्रतिष्ठित मंडळी समजवण्यासाठी आल्यास त्यांना सुद्धा मारहाण करु, अशी धमकी योगेश मारगाये, दिनेश मारगाये व मुकेश नाईक यांनी दिल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला. संबंधितांवर रितसर कारवाई करुन हे प्रकरण संपविण्याची अपेक्षा केली. पत्रपरिषदेला रमेश रामटेके, दिलीप रामटेके, वामन खोब्रागडे, हेमंत गोंडाने, ईश्वरदास खोब्रागडे, सोनदास गणवीर, यशवंत गणवीर, नाना शहारे, भाऊराव खोब्रागडे,व्यंकट खोब्रागडे,नरेश रामटेके उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)