शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता करवसुली वांद्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:20 IST

मालमत्ता कर वसुली अगोदरच कमी असताना त्यात आता मोहरीरची बीएलओ ड्यूटी लावण्यात आली आहे. नगर परिषदेला यंदा ९.३५ कोटी मालमत्ता कर वसुली टार्गेट असतानाच कर विभागात बोटावर मोजण्या एवढेच कर्मचारी उरले आहेत.

ठळक मुद्देमोहरीरची बीएलओ ड्युटी : टार्गेट ९.३५ कोटी वसुलीचे

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मालमत्ता कर वसुली अगोदरच कमी असताना त्यात आता मोहरीरची बीएलओ ड्यूटी लावण्यात आली आहे. नगर परिषदेला यंदा ९.३५ कोटी मालमत्ता कर वसुली टार्गेट असतानाच कर विभागात बोटावर मोजण्या एवढेच कर्मचारी उरले आहेत. परिणामी यंदा नगर परिषदेची मालमत्ता कर वसुली वांद्यातच दिसून येत आहे. मागील वर्षी ४८.८४ टक्के कर वसुली झाली होती. यंदा मात्र तो आकडाही सर करणे सध्या तरी कठीणच वाटत आहे.मागील वर्षी ४८ टक्केच्या घरात मालमत्ता कर वसुली झाली होती. नगर परिषदेला मालमत्ता कर वसुली हेच मोठे आर्थिक स्त्रोत असून एवढी कमी वसुली झाल्याने नगर परिषदेची डोकेदुखी वाढली होती. त्यामुळे यंदा तरी किमान ८० टक्के कर वसुली व्हावी यासाठी नगर परिषदेने आतापासूनच नियोजन सुरू केले होते. यंदा नगर परिषदेला मागील थकबाकी ४ कोटी ८६ लाख ६५ हजार ३१७ रूपये व चालू मागणी ४ कोटी ४८ लाख ७९ हजार १३१ रूपये असे एकूण ९ कोटी ३५ लाख ४४ हजार ४४८ रूपये कर वसुलीचे टार्गेट आहे. त्यानुसार, नगर परिषदेकडून प्रयत्न केले जात होते. मात्र मधातच आता बीएलओचे काम आले असून त्यासाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली आहे. त्यातही कर विभागातील मोहरीर व अन्य कर्मचाºयांचाही यात समावेश करण्यात आल्याने आता कर विभागात बोटावर मोजण्या एवढेच कर्मचारी उरले आहेत.कर वसुलीचे काम मोहरीर करीत असून त्यांना आपापल्या प्रभागातील भक्कम माहिती आहे. मात्र मोहरीर आता बीएलओच्या कामात लागल्याने कर वसुलीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे मागील वर्षी झालेली ४८.८४ टक्के वसुलीही यंदा जड दिसत आहे.मालमत्ता कर वसुली हेच नगर परिषदेचे सर्वात मोठे आर्थिक स्त्रोत आहे. मात्र यंदा मालमत्ता कर वसुलीच वांद्यात दिसून येत असल्याने नगर परिषदेची अडचण नक्कीच वाढणार यात शंका नाही. त्यादृष्टीने आता नगर परिषद यावर काय तोडगा काढते याकडे लक्ष लागले आहे.चार कर्मचांऱ्यांवर वसुलीची धुरानगर परिषद कर विभागात १७ मोहरीर असून त्यातील १६ मोहरीरची बीएलओ ड्यूटी लावण्यात आली आहे. म्हणजे एकच मोहरीर उरले आहेत. शिवाय, सहायक कर निरीक्षक खोब्रागडे यांची बदली झाली आहे. तर त्यांच्या जागेवर परवाना विभागातील घोडेस्वार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे नाव बीएलओमधून वगळण्यात आल्याची माहिती आहे. शिवाय अतिरीक्त प्रभार देण्यात आलेले मुकेश मिश्रा व श्याम शेंडे यांच्यापैकी शेंडे यांची ड्यूटी लावण्यात आली आहे. तर जगदीश गाते हे कनिष्ठ लिपीक उरले आहेत. त्यामुळे चार कर्मचाऱ्यांवर वसुलीची धुरा आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाTaxकर