शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सुलभ निवडणुकीसाठी योग्य नियोजन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 22:02 IST

मतदारांना विविध सोयी-सुविधा तसेच त्यांच्या अनेक अडी-अडचणी आणि समस्यांचे निराकरण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाकडून नियोजित करण्यात आले असून जिल्हाधिकारी डॉ.कादम्बरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागप्रमुखांची विभागनिहाय विधानसभा निवडणूक तयारी पूर्व आढावा बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली.

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक तयारीपूर्व आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आगामी विधानसभा निवडणूक २०१९ करिता भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणूका’ हे घोष वाक्य जाहीर केले आहे. मतदारांना विविध सोयी-सुविधा तसेच त्यांच्या अनेक अडी-अडचणी आणि समस्यांचे निराकरण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाकडून नियोजित करण्यात आले असून जिल्हाधिकारी डॉ.कादम्बरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागप्रमुखांची विभागनिहाय विधानसभा निवडणूक तयारी पूर्व आढावा बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली.येत्या ३१ आॅगस्ट रोजी मतदार यादीचे प्रकाशन होणार असून निकाली काढण्यात आलेले दावे, हरकतीच्या उच्चतम तपासणीचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. या बैठकीत कायदा-सुव्यवस्था तसेच मतदान केंद्रावर दिव्यांग व वयोवृध्द मतदारांसाठी विशेष सुविधा,नोडल आॅफिसर नियुक्त करणे, निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रचार प्रसार करणे, अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर सी.सी.टिव्ही कॅमरे, तसेच निणडणुकीचे सर्व महत्त्वाचे कामे दिलेल्या वेळेच्या आत करण्याचे स्पष्ट निर्देश देऊन जवाबदारी निश्चित करण्यात आली. नवमतदारांना लोकशाही प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करुन निवडणुकीच्या उत्सवात सहभागी करण्याची सूचना देण्यात आल्या. तसेच स्वीप कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यात प्रचार प्रसार करुन मतदारांच्या अधिकाराची जाणीव करुन देणे याबाबत आढावा घेण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे,निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, निवडणूक उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, राहुल खांडेभराड, पोलीस उपअधीक्षक (गृह) सोनाली कदम, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी विजय चव्हान, कार्यकारी अभियंता मिथीलेश चव्हान, कोषागार अधिकारी व्ही.ए.जवंजाळ, जिल्हा नियोजन अधिकारी प्र.वि.बुलकुंडे, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवरे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी पंकज गजभिये, सहाय्यक सुरेश वासनीक, जिल्हा प्रशासन अधिकारी विनोद जाधव, निवडणूक विभागाचे हरीशचंद्र मडावी,अधीक्षक आर.एस.पटले, प्रवीण जमधाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूक