शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नतीपर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 23:01 IST

जिल्हा पोलीस विभागात कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपर स्टार लावून पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आले. ६ पोलीस हवालदार, ८ पोलीस नाईक, १० पोलीस शिपायांचा यात समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा पोलीस विभागात कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपर स्टार लावून पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आले. ६ पोलीस हवालदार, ८ पोलीस नाईक, १० पोलीस शिपायांचा यात समावेश आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात बुधवारी (दि.२०) झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सर्व पदोन्नती मिळालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक हरिष बैजल व गृह उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या हस्ते स्टार व फित लावण्यात आले.या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गौरव कार्यक्र माच्या माध्यमातून इतर पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना प्रेरणा मिळावी आणि त्यांनीही चांगले कार्य करुन स्टार मिळविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे. यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केल्याचे हरिष बैजल यांनी सांगितले. या वेळी पोलीस हवालदार ते सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर नत्थू मेश्राम, कमलसिंग सुर्यवंशी, मोतीराम मरसकोल्हे, खुशाल भस्मे, प्रितमलाल सुरसावंत व फलेंद्र गिरी यांचा समावेश आहे. पोलीस नाईक ते पोलीस हवालदार पदावर बालाजी कोकोडे, ज्ञानेश्वर औरासे, नरेशकुमार साखरे, दशरथ मसराम, धर्मेंद्र परतेकी, रमेश बिसेन, प्रतिभा राऊत, विलास घोरमारे यांचा समावेश आहे. तर पोलीस शिपाई ते पोलीस नाईक पदावर हरगोविंद उके, तुरषा लिल्हारे, सुनीलकुमार कोहळे, मकरंद मोहिते, सरोज घरडे, आशिषकुमार अग्निहोत्री, पंकज सव्वालाखे, गुलाबदास तुरकर, पुस्तकला बिसेन, संजयकुमार बेलपांडे यांचा समावेश आहे.या सर्व पदोन्नती झालेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना एक वेतन वाढ अधिक मिळणार आहे. तसेच तपासामध्ये सुध्दा अधिकचे अधिकार मिळाले आहेत. कार्यक्र माला पोलीस निरीक्षक चांदा, पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे, ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारनवरे यांच्यासह कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिस