शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रचार थंडावला, आता घरोघरी भेटीतून संपर्क

By admin | Updated: July 24, 2015 01:18 IST

जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी सायंकाळी उमेदवारांचा जाहीर प्रचार थांबला असला तरी ...

निरीक्षकांकडून पाहणी : भयमुक्त वातावरणात मतदान करण्याचे आवाहनगोंदिया : जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी सायंकाळी उमेदवारांचा जाहीर प्रचार थांबला असला तरी पुढील २४ तासात घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांकडून जोर दिला जाणार आहे. दरम्यान निवडणूक निरीक्षकांनी काही तालुक्यांना भेटी देऊन यंत्रणेच्या तयारीची पाहणी केली. सोबतच नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदान करण्याचे आवाहन केले.राज्य निवडणूक आयोगाने देवरी, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व गोरेगाव तालुक्यातील ग्राम पंचायतच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकीच्या कामाची पाहणी करण्यासाठी नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक सुरेश वानखेडे यांनी आज २२ जुलै रोजी देवरी येथील आयटीआय मधील निवडणुकीची तयारी व मतमोजणी केंद्र असलेल्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार संजय नागटिळक उपस्थित होते. निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्या सूचना यावेळी वानखेडे यांनी केल्या.निवडणूक निरीक्षकांनी मतदानासाठी इव्हिएम मशीन तयार करण्याच्या कामाची व स्ट्राँग रूमची पाहणी केली. देवरी तालुक्यातील २९ ग्राम पंचायतच्या सार्वत्रिक व ३ ग्रामपंचायतच्या पोट निवडणुकीसाठी २५ जुलै रोजी मतदान तर मतमोजणी २७ जुलै रोजी होणार आहे. यासाठी ७४ मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत. यावेळी वानखेडे यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेची माहिती जाणून घेतली. तसेच भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, व्हिडीओ सर्वेक्षण पथक व लेखा पथकाची सुद्धा माहिती जाणून घेतली.ग्रामपंचायत निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निरीक्षक सुरेश वानखेडे यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)नक्षलग्रस्त तालुक्यात दुपारी ३ पर्यंत मतदानदेवरी तालुका नक्षलदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ अशी राहणार आहे. मतदान कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर साहित्यासह घेऊन जाण्यासाठी ८ बसेस व ५ शासकीय वाहन तैनात ठेवण्यात येणार आहेत. निवडणूक होणाऱ्या ग्राम पंचायतीच्या मतदान केंद्रांपैकी १९ मतदान केंद्र अतिसंवेदनशील व ६ मतदान केंद्र संवेदनशिल आहेत. देवरी तालुक्यातील २९ ग्राम पंचायतमधील ८३ उमेदवार अविरोध निवडून आलेत.