अनेक महिन्यांपासून पगार नाही : शिक्षकांचे समायोजन झालेच नाहीदेवरी : आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांद्वारे अनेका प्रताडित झाल्याने व भागातील अनेक महिन्यापासून प्रकल्प अधिकारी देवरी यांनी पगार व ऐरियस न दिल्यामुळे त्रस्त शिक्षकांने आज बुधवारला चक्क प्रकल्प अधिकाऱ्याच्या कक्षाचे कुलूप तोडून प्रकल्प अधिकाऱ्याची खुर्ची कार्यालयाबाहेर रस्त्यावर फेकून खुर्चीवर चप्पलाचा वर्षाव केला व आपला संताप जाहीर केला. यावेळी बघ्याची गर्दी जमली होती. बुधवारला सकाळी १०.३० वाजता कर्मचारी कार्यालयात पोहोचत असतानाच बंद झालेल्या पांढराबोडी आश्रम शाळेतील शिक्षक नामदेव नत्थू मलये यांनी कार्यालयात प्रवेश करून दगडाच्या साहाय्याने प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कक्षाचे कुलूप तोडले. आतमध्ये प्रवेश करून प्रकल्प अधिकाऱ्यांची खुर्ची बाहेर रस्त्यावर आणली व त्या खुर्चीवर चपला मारून आपला संताप व्यक्त केला. शिक्षकांच्या रागाला बघून कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळविले. यावेळी बघणाऱ्यांच्या गर्दीमुळे चिचगड मार्गावर चक्काजामची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी त्या शिक्षकाला ताब्यात घेतले. या कार्यालयाच्या ३५ कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशन गाठून श्क्षिकांविरुद्ध तक्रार दाखल केली.प्राप्त माहितीनुसार मे २०१५ मध्ये शासनाने सडक अर्जुनी, सालेकसा व पांढराबोडी येथील अनुदानित आश्रम शाळांना बंद केले होते. या शाळेतील सर्व शिक्षकांना इतरत्र समायोजित केले. परंतु अनेक शिक्षकांना अजूनपर्यंत पगार मिळत नाही. पांढराबोडी शाळेतील शिक्षक नामदेव नत्थू मलये यांना अप्पर आयुक्त आदिवासी विभाग नागपूर यांनी एक वर्षा अगोदर अहेरी प्रकल्प कार्यालय अंतर्गत देवलवाडी येथील अनुदानित आश्रम शाळेत या शिक्षकांचे समायोजन केले. परंतु तेथे गेल्यावर या शिक्षकाला घेण्यास त्या शाळेतील संचालकाने स्पष्ट नकार दिला. त्यानंतर या शिक्षकाने समायोजन करण्याकरिता सर्व अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. परंतु समायोजन झाले नाही. अनेक महिन्याचे वेतन व ऐरीयस प्रकल्प अधिकारी देवरी यांनी दिले नाही. ही घटना सकाळी १०.३० वाजता घडली व प्रकल्प अधिकारी १२.३० वाजता कार्यालयात पोहोचले तोपर्यंत सर्व कर्मचारी लेखनीबंद करुन कार्यालयासमोर उभे होते.या घटनेसंबंधी प्रकल्प अधिकारी गिरीष सरोदे म्हणाले, या शिक्षकाच्या वेतनासंबंधी अहेरी प्रकल्प कार्यालयात प्रकरण आहे. (प्रतिनिधी)‘त्या’ शिक्षकावर गुन्हा दाखलदेवरीच्या प्रकल्प कार्यालयात धूडघूस घालणाऱ्या शिक्षकावर देवरी पोलीस ठाण्यांत शासकीय कामात अडथळा केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला. नामदेव नकटू मलये (३९) रा. देवरी असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. सहाय्यक प्रकल्प अधिकारी पुंडलीक नत्थू रघुते यांच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रकल्प अधिकाऱ्याची खुर्ची त्रस्त शिक्षकाने फेकली रस्त्यावर
By admin | Updated: February 11, 2016 02:01 IST