शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

अभियंता पशीनेंवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध

By admin | Updated: June 23, 2014 23:56 IST

विद्युत वितरण कंपनीचे अभियंता व्ही.पी. पशिने यांच्यावर नोंदविण्यात आलेल्या विनयभंग व एट्रॉसिटीच्या गुन्ह्याचा महावितरण कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने निषेध व्यक्त केला.

गोंदिया : विद्युत वितरण कंपनीचे अभियंता व्ही.पी. पशिने यांच्यावर नोंदविण्यात आलेल्या विनयभंग व एट्रॉसिटीच्या गुन्ह्याचा महावितरण कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने निषेध व्यक्त केला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि.२३) द्वारसभा घेऊन २५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. २० जून रोजी रात्री १०.३० वाजता दरम्यान विद्युत वितरण कंपनीचे अभियंता व्ही.पी. पशीने, सहकारी कर्मचारी श्रीकृष्ण सांगोळे व ढेगंळे हे लाईनचे ब्रेक डाऊन करुन येत असताना कुडवा येथील चंद्रकांत सुर्यवंशी यांचे घरी डायरेक्ट हूक टाकून विजेचा वापर होत असल्याचे त्यांचे दिसले. यावर पशीने यांनी आपल्या सहकाऱ्यांना हुक काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांनी कारवाई पुर्ण केली व पशीने सहकाऱ्यांसह जय अंबे हॉटेल समोर आले. दरम्यान सुदाराम राव, रुपाली उईके, चंद्रकांत सुर्यवंशीसह इतरांंनी धक्का बुक्की करून पशीने व सहकाऱ्यांना मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली.एवढेच नव्हे तर रुपाली उके यांनी पशीनेंवर घरी येवून विनयभंग केल्याची खोटी तक्रार पोलीस स्टेशन येथे दाखल केली.व्ही.पी. पशीने यांनी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या घरचे डायरेक्ट लागलेले हुक काढल्यामुळे विनयभंग व अनुसुचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन व्ही.पी. पशीने यांना अटक करण्यात पोलिसांना बाध्य केले. यावर महावितरण कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने रामनगर कार्यालयात सोमवारी (दि.२३) द्वारसभा घेऊन पशीने यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाई व अटकेचा निषेध व्यक्त केला. विशेष म्हणजे या घटनेच्या निषेधार्थ २५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय या द्वार सभेत घेण्यात आला. या द्वारसभेला हरीश डायरे, अभय मेश्राम, एस.एस. फुंडे, वाय.आर. सोनुले, दिगंबर कटरे, राजू बोंदरे, काका कावरे, एस.एस. पांडे, जुमडे, अरुण दशपुत्रे, ताराचंद कुंभलकर, सुनिल रेवतकर, एस.जी. जैस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येने महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)